औरंगाबादेत 'झेडपी'समोर सरणावर उपोषण

Aurangabad
Aurangabad

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथील सरपंच उषा संभाजी नरके यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि सरपंच पदावरून बडतर्फ करावे या मागणीसाठी पाच ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर मंगळवारी (ता. 16 ) मरणासाठी सरण रचून त्या सरणावर उपोषण सुरू केले. 

सरपंच उषा नरके आणि ग्रामविकास अधिकारी किडे मोरे यांनी अपहार केल्याची या सदस्यांची तक्रार आहे.उपसरपंच प्रभा निकाळजे,  रामदास खवले, दिलीप नरके, प्रयाग राऊत, सोनाली नरके हे ग्रामपंचायत सदस्य उपोषणाला बसले आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षिरसागर यांनी या वेगळ्याच उपोषणाची तात्काळ दखल घेत उपोषणस्थळी धाव घेतली.

सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना आठ दिवसात आहवाल मागवुन कारवाई चे अश्वासन दिल्यानंतर सरणावर कफन पांघरूण सरणावर उपोषण.करणारे रामदास खवले सरणावरून उठले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com