बीएसनएनल बचोओसाठी कर्मचारी रस्त्यावर 

Agitation of BSNL Company workers
Agitation of BSNL Company workers

औरंगाबाद - बीएसएनएल कंपनीच्या 66 हजार मोबाईल टॉवर्सवर केंद्र सरकारतर्फे स्वतंत्र उपकंपनी स्थापन करणार आहे. कालांतराने ही कंपनी खाजगी उद्योगपतीला भागीदार करून डाव सरकार आहे. यामुळे बीएसएनएल युनियन्स, असोसिएशनयांच्यातर्फे ही उपकपंनीस विरोध करण्यात येत आहे. यासाठी देशभर जनजागृती करण्यात येत आहे.

औरंगाबादेत शुक्रवारी (ता. 11) शहरात विविध ठिकाणी बीएसएनएल बचाओसाठी कर्मचारी आणि युनियन रस्त्यावर उतरत जनजागृती केली. 
औरंगाबादेत गेल्या आठवड्याभरापासून युनियनचे कर्मचारी बीएसएनल बचोओसाची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील विविध भागात जनजागृतीचे माहितीपत्रकांचे वाटप केले जात असून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्वतंत्र उपकंपनीमुळे बीएसएनलचे विभागन होणार आणि कलांतराने ही कंपनी तोट्यात जात खाजगीकरण करण्यात येणार आहे. देशातील नागरिकांना स्वस्त व सुरक्षित सेवा देणाऱ्या या कंपनीबाबत सरकार नकारात्मक भूमिका घेत आहे.

केंद्रीय अर्थ संकल्पात बीएसएनएलसाठी एक रुपयांचीाही तरतुद केली नाही. ग्रामीण भागातील तोट्याच्या सेवांची कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही. फोर-जी सेवा देण्यासाठी सरकारने स्पेक्‍ट्रमची व्यवस्था केलेली नाही. सरकारी गुतवणूक शुन्य आहे. सर्व सवलती बंद करण्यात आल्याने ही कपंनी तोट्यात दाखवली जात आहे. साधन सामुग्री व आधुनिक तंत्रज्ञान देण्यात येत नाही. निती आयोगाने बीएसएनएलची विक्री करण्याची शिफारस केली आहे. प्रतिकुल परिस्थितीतही बीएसएनएल ही वर्षाकाठी 25 हजार कोटीचे उत्पन्न शासनाला देत आहे. खाजगी कंपन्या लुट करीत असताना ग्राहकांना स्वस्तात आणि कमी किंमतीत सेवा देणाऱ्या बीएसएनल बंद पाडण्याचा डाव हाणून पाडण्याचा निर्णया युनियन आणि असोसिएशन घेतला आहे. यासाठी सर्वत्र सभा, बैठक घेण्यात येत असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले. शहरातील बजरंग चौकात रंजन दाणी, विलास सवडे, राज निंबाळकर, विठ्ठलसिंग ठाकूर, ईश्‍वर गायकवाड, ए. एन. कुलकर्णी, एम.बी. कुलकर्णी, आर. जे. पाटील, पी. यु. मगरे, शिवाजी चव्हाण यांनी सहभाग घेतला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com