सुधीर ढवळे यांच्या सुटकेसाठी परभणीत निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

परभणी - सुधीर ढवळे व सुरेंद्र गडलिंग यांच्यासह इतर कार्यकर्त्याची तात्काळ सुटका करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देत भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियांनाच्यावतीने शुक्रवारी (ता. आठ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

परभणी - सुधीर ढवळे व सुरेंद्र गडलिंग यांच्यासह इतर कार्यकर्त्याची तात्काळ सुटका करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देत भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियांनाच्यावतीने शुक्रवारी (ता. आठ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

आंबेडकरी कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना बुधवारी (ता.सहा) संघटनेच्या गोवंडी येथील कार्यालयातून अटक करण्यात आली. सुधीर ढवळे हे भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान या आघाडीचे राज्य समन्वय समितीचे सदस्य आहेत. कोरेगाव भीमा येथे घटनेतील संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे खरे सुत्रधार आहेत असा आरोप यावेळी आंदोलन कर्यकर्त्यांनी केला. त्यानंतर याच प्रकरणात सुधीर ढवळे व सुरेंद्र गाडगीळ यांना पोलिसांनी बुधवारी (ता.सहा) अटक केली आहे. या अटकेचा संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला. 

कोरेगाव भीमा येथील घटनेची चौकशी आयोगापुढे मांडण्याचे काम सुनील ढवळे हे करित होते. त्यामुळेच त्यांना गजाआड करण्यात आले आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. सुधीर ढवळे व सुरेंद्र गडलिंग यांच्यासह इतर कार्यकर्त्याची तात्काळ सुटका करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देत भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानाच्यावतीने शुक्रवारी (ता. आठ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 

यावेळी गणपत भिसे, अशोक उफाडे, सुरेश शेळके, यशवंत मकरंद, उत्तम  गोरे, अशोक उबाळे, प्रकाश बनपट्टे, किशोर कांबळे, कोंडीबा जाधव, अरूण गिरी आदींची उपस्थिती होती.
 

Web Title: agitation in parbhani release of Sudhir Dhawale