लातुरात अखिल भारतीय संत साहित्य संमेलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

लातूर - वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने संत साहित्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सहावे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन 27, 28 व 29 मे रोजी लातूर येथे होईल, अशी माहिती सदानंद मोरे व विठ्ठल पाटील यांनी दिली.

संत साहित्याचा प्रसार व प्रचार करण्यासह परिषदेतर्फे नाशिक येथे 2012 मध्ये पहिले साहित्य संमेलन घेण्यात आले होते. त्यानंतर नवी मुंबई, शेगाव, नांदेड व पुणे येथे संमेलने झाली. यंदाचे सहावे साहित्य संमेलन लातूर येथे होत आहे. शेतकरी आत्महत्या, स्त्रीभ्रूणहत्या, सुजल नियोजन, वृक्षारोपण, काटकसरीचे विवाह, ग्रामस्वच्छता अभियान व व्यसनमुक्ती या सात सूत्रांवर परिषदेच्या वतीने कार्य केले जाणार आहे. लातूर येथील संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: akhil bhartiy sant sahitya sammelan in latur