दोन तोंडाच्या बाळाचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

अंबाजोगाई - येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसुती विभागात काल (ता.29) रात्री जन्मलेल्या दोन तोंड असलेल्या बाळाचे आज (ता.30) दुपारी तीनला रुग्णालयात उपचार चालू असतांनाच निधन झाले.

काल रात्री साडेआठला जन्मलेल्या या बाळावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. या विभागात काम करणाऱ्या तज्ञ डॉक्‍टरांनी या बाळाला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र उपचारासाठी प्रतिसाद न दिल्यामुळे त्या बाळाने अखेरचा श्वास घेतला.

रुग्णालयातील डॉक्‍टरांनी हे बाळ वैद्यकीय अभ्यासासाठी रुग्णालयाच्या शरीर रचनाशास्त्र विभागात ठेवण्याची विनंती केली. मात्र पालकांची मानसिकता याबाबत अनुकूल नसल्यामुळे व त्यांच्या भावनांचा आदर करीत मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान आज दिवसभर या बाळाची चर्चा सोशल मिडिया आणि अंबाजोगाई शहरात व परिसरात सुरू होती.