अंबाजोगाईत पहाटे वादळवाऱ्यासह पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

अंबाजोगाई - शहर व तालुक्‍यात बुधवारी (ता.सात) पहाटे वादळीवाऱ्यासह दमदार पाऊस झाला. या पावसामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडित होता. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. शहर परिसरात पहाटे ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्‍यात यंदा मृग नक्षत्रापूर्वी शनिवारी (ता. ३) पाऊस झाला. त्यानंतर रविवारी (ता. ४) शहर वगळता कुंबेफळ, पाटोदा, ममदापूर, देवळा, अकोला, तडोळा या भागांत ४० मिलिमीटर पाऊस झाला.

बुधवारी पहाटे पुन्हा पावसाने हजेरी लावली. अंबाजोगाई व घाटनांदूर वगळता इतर भागांत मात्र या पावसाचे प्रमाण कमी होते. 

पहाटे अडीचच्या सुमारास जोराचे वारे व मेघगर्जनेसह पावसाला प्रारंभ झाला. हा दमदार पाऊस साडेतीनपर्यंत सुरूच होता. या पावसामुळे शहरातील नाल्या ओसंडून वाहत होत्या. 

शहरातून वाहणाऱ्या जयवंती नदीलाही पाणी आले. अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्याने रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग साचले होते. नाल्याबरोबरच रस्त्यावरूनही पाणी वाहिले. 

उन्मळली झाडे 
शहरातील विद्याकुंज सोसायटीतील डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या घरातील गुलमोहराचे झाड जोराच्या वाऱ्यामुळे उन्मळून पडले. हे झाड त्यांच्या गाडीवर पडल्यामुळे या गाडीचेही काही प्रमाणात नुकसान झाले.

गावेही अंधारात
तालुक्‍यातील उजनी येथे विजेचे चार खांब पडल्यामुळे या गावासह इतर काही गावांचा वीजपुरवठा २४ तास गायब होता. तालुक्‍यातील धानोरा वीज उपकेंद्रातही बिघाड झाल्याने या केंद्रांतर्गत असणारी दहा ते पंधरा गावे अंधारात होती. बुधवारी (ता.७) सायंकाळी या गावचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता राजेश अंबेकर यांनी दिली.

वाण नदी वाहिली
बुधवारच्या पावसामुळे तालुक्‍यातील डोंगरी भागातून वाहणारी वाण नदीही वाहती झाली. या पाण्यामुळे या नदीवर पठाण मांडवा येथे मानवलोक व लोकसहभाग आणि पाणी फाउंडेशनच्या श्रमदानातून करण्यात आलेले डोह काही प्रमाणात भरले. या डोहात पहिलेच पाणी आल्याने लोकसहभाग आणि श्रमदानातून केलेल्या कामाचे फलित झाल्याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्‍त केला.

टॅग्स