औरंगाबादेत कुलर बनविण्याऱ्या आनंद इंडस्ट्रीजला आग ; कोट्यवधींचे नुकसान

औरंगाबादेत कुलर बनविण्याऱ्या आनंद इंडस्ट्रीजला आग ; कोट्यवधींचे नुकसान

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीतील एअर कुलर बनविणाऱ्या आनंद इंडस्ट्रीज कंपनीला शुक्रवारी (ता. 21) दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. आगीत सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले असून महावितरणचे "शटडाऊन' असल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. 

चिकलठाणा एमआयडीसीतील गरवारे कंपनीच्या मागे कुंदन शिवाजी रेड्डी यांच्या मालकीची आनंद इंडस्ट्रीज कंपनीत आहे. रेड्डी यांनी "सकाळ'ला माहिती दिली. ते म्हणाले, "शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच गणपतीची आरती करण्यात आली. एमआयडीसीतील कंपन्यात आज शटडाऊन असल्याने याही कंपनीत केवळ लेखाधिकारी होत्या. त्या चहा घेण्यासाठी बाहेर गेल्या असता, दुपारी साडेबाराच्या सुमारास धूर येऊ लागला.'' आग लागल्याची कळताच उपस्थितांनी शेजारील गरवारे कंपनीत कळविले. तेथील अग्नीशमन यंत्रणा तत्काळ पोचली. त्यापाठोपाठ महापालिकेचेही बंब आले. पाच बंबाद्वारे तब्बल दीड तासांनी आग आटोक्‍यात आणली''. 

शटडाऊन असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एरव्ही 25 कामगार याठिकाणी असतात. एअर कुलर बनविण्यासाठी रेझिन केमिकलचा साठा मोठ्या प्रमाणात कंपनीत होता. मात्र, तो इमारती बाहेरील गोडाऊनमध्ये ठेवला असल्याने मोठा अनर्थ टळला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com