‘भूमिगत’ची वाटचाल  बंद पडण्याच्या दिशेने 

माधव इतबारे  
सोमवार, 16 एप्रिल 2018

औरंगाबाद - ‘समांतर’पाठोपाठ महापालिकेची आणखी एक मोठी योजना अर्धवट अवस्थेत राहण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत केलेल्या कामापोटी महापालिकेकडे ४० कोटी रुपये थकीत असून, यापुढे पैसे लावण्याची आपली तयारी नाही, असे पत्र कंत्राटदाराने महापालिकेला दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. योजना पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून सर्वसाधारण सभेत प्रलंबित आहे, त्यावर निर्णय होत नसल्यामुळे काही काम महिन्यांपासून बंदच आहे. 

महापालिकेने मोठा गाजावाजा करून ४६५ कोटींच्या भूमिगत गटार व ७९२ कोटींच्या समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले होते. या कामाचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले; मात्र अवघ्या दीड वर्षात ‘समांतर’ बंद पडली; तर आता ‘भूमिगत’ची वाटचाल त्याच मार्गाने सुरू आहे. महापालिकेच्या जुन्या मुख्य मल-जल निस्सारण वाहिन्या खाम, सुखना नदी परिसरात जागोजागी फुटल्याने दुर्गंधीयुक्त पाणी नद्या, गटारांमधून वाहत आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषणाचा विषय गंभीर बनला होता. भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर ड्रेनेजचे वाहणारे पाणी बंद होईल, असा दावा प्रशासनाने केला होता; मात्र गेल्या तीन वर्षांत १८२ कोटी ३५ लाख रुपयांचे बिल कंत्राटदाराला दिल्यानंतरही खाम, सुखना नद्यांमधील घाण पाणी बंद झालेले नाही. 

८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा  
कंत्राटदार ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करीत आहेत. नद्यांमधून वाहणारे पाणी बंद झाले नसल्याने योजनेवर आक्षेप घेत कर्ज घेण्याच्या ५४ कोटींच्या प्रस्तावाला नगरसेवक विरोध करत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत प्रलंबित आहे. 

कोट्यवधींची कामे शिल्लक 
वॉर्डअंतर्गत, रेल्वेलाइनच्या खालून वाहिन्या टाकणे, मल-जल प्रकल्प कार्यान्वित करणे अशी कोट्यवधी रुपयांची कामे अद्याप शिल्लक आहेत. 

Web Title: Another big plan of the municipal corporation is partially underlined