जालना येथे लष्कर भरती कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

औरंगाबाद - औरंगाबादच्या लष्कर भरती केंद्राच्या वतीने 27 एप्रिल ते 7 मेदरम्यान लष्कर भरती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

औरंगाबाद - औरंगाबादच्या लष्कर भरती केंद्राच्या वतीने 27 एप्रिल ते 7 मेदरम्यान लष्कर भरती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
जालना येथे होणाऱ्या या भरती कार्यक्रमासाठी 7 मार्च ते 11 एप्रिलदरम्यान www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर आपली ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. या भरती प्रक्रियेत नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद, बुलडाणा, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील उमेदवार सहभागी होऊ शकतात. तालुकानिहाय वेळापत्रक हे ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर घोषित करण्यात येईल. यात सोल्जर (जनरल ड्युटी, टेक्‍निकल, क्‍लर्क, स्टोअर किपर, ट्रेड्‌समन) या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: army recruitment in jalana