माजलगाव येथे १९ थकबाकीदारांचे प्लॉट जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

माजलगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फुले पिंपळगाव शिवारामध्ये व्यापारासाठी तीस वर्षांच्या भाडेपट्ट्यावर (लीज) सहन प्लॉट विक्री करण्यात आली होती. परंतु या गाळेधारकांनी अद्यापपर्यंत गाळ्याची रक्कम न भरल्याने गुरुवारी (ता. २२) बाजार समिती प्रशासनाने १९ प्लॉट जप्त केले आहेत. 

माजलगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फुले पिंपळगाव शिवारामध्ये व्यापारासाठी तीस वर्षांच्या भाडेपट्ट्यावर (लीज) सहन प्लॉट विक्री करण्यात आली होती. परंतु या गाळेधारकांनी अद्यापपर्यंत गाळ्याची रक्कम न भरल्याने गुरुवारी (ता. २२) बाजार समिती प्रशासनाने १९ प्लॉट जप्त केले आहेत. 

येथील बाजार समितीने फुलेपिंपळगाव येथील मोंढ्यामध्ये तीस वर्षासाठी व्यापाऱ्यांना सहन प्लॉट लीजवर दिले होते. या व्यापाऱ्यांनी लीजची रक्कम न भरल्यामुळे व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी झाली होती. यावर नवनिर्वाचित सभापती अशोक डक यांनी थकबाकीदारांना जाहीर आवाहन करून नोटीस, अंतिम नोटीस, वेळोवेळी कळवूनदेखील व्यापाऱ्यांनी लीज रक्कम भरणा न केल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने गुरुवारी १९ प्लॉट जप्त केले आहेत. उर्वरित व्यापाऱ्यांनी लीज रक्कम अदा न केल्यास ही कारवाई सुरूच राहील, असे सचिव डी. बी. फुके यांनी सांगितले आहे. यावेळी पंचनामा करताना बाजार समितीचे एच. एन. सवणे, बंडू वाघमारे, ए. डी. आगे, एस. एम. येवले यांचा समावेश होता.   

बाजार समितीवर दोन कोटी रुपयांचे कर्ज आहे. फुलेपिंपळगाव शिवारामध्ये व्यापाऱ्यांसाठी दिलेल्या प्लॉटधारकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. बाजार समिती कर्जमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. व्यापाऱ्यांनी थकबाकी भरणा करून बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे.
- अशोक डक, सभापती, बाजार समिती, माजलगाव

मराठवाडा

उस्मानाबाद, लातूर - उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील वेगवेगळ्या घटनांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  खामसवाडी (ता....

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

‘संस्थान गणपती’तर्फे साकारला जाणार सजीव देखावा, विविध कार्यक्रमांचे आयोजन  औरंगाबाद - शहरातील मानाचा म्हणून परिचित...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

शंभर कोटींच्या ३१ रस्त्यांना अखेर शासनाची प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविली नियंत्रणाची जबाबदारी  औरंगाबाद -...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017