अश्विनीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आयुक्त साकारणार

Ashwini will become the dream commissioner to become a doctor
Ashwini will become the dream commissioner to become a doctor

लातूर : वर्षभर धुनीभांडी करून दोन भावांना हातभार लावत महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अश्विनीच्या समोर पुढच्या  शिक्षणाचा प्रश्न मोठा होता. शिक्षणच घेता येईल की नाही अशी काहीशी परिस्थिती. हे पाहिल्यानंतर संवेदनशील असलेले आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी अश्विनीच्या एमबीबीएसपर्यंतच्या शिक्षणाचे पालकत्व स्विकारले  आहे. त्यामुळे आता अश्विनीच्या पुढील शिक्षणाची वाट मोकळी झाली आहे. 

महापालिकेची शाळा क्रमांक नऊला याचवर्षी दहावीची मान्यता मिळाली आहे. 
या शाळेत अश्विनी कमलाकर हंचाटे ही मुलगी दहावीच्या परिक्षेत ९४.४० टक्के
गुणे यशस्वी झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीत राहत असताना जिद्दीच्या जोरावर 
तीने हे यश संपादन केले आहे. महापालिकेच्या शाळेतून या मुलीने यश संपादन
केल्याने आयुक्त दिवेगावकर यांनी तीला स्वतःच्या घरी बोलावले. स्वतःच्या
आई वडिलांच्या हस्ते तीला पेढा भरवून कौतूक केले. आयुक्तांकडून झालेल्या
या गौरवाने अश्विनीही भारावून गेली.

यावेळी दिवेगावकर यांनी तीलापुढे काय होणार याची विचारणा केली असता डॉक्टर होण्याचीइच्छा तीने व्यक्त केली. पण तीची कहानी ऐकल्यानंतर दिवेगावकर
यांनाही तीच्या शिक्षणाचा प्रश्न पडला. महानगरपालिकेच्या शाळेमध्ये अश्विनीने कसे बसे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तीला वडिलांचे छत्र नाही ना आईचा आधार. दोन समव्यस्क भाऊ मजुरी करतात. त्यांना हातभार लावावा म्हणून अश्विनीने धुनीभांडे करीत दहावीत हे यश मिळवले आहे. अश्विनीची शिक्षणाची ही जिद्द पाहून दिवेगावकर यांनी तातडीने तीच्या एमबीबीएस पर्यंतच्या शिक्षणाचे पालकत्व घेतले आहे. डॉक्टर होण्यासाठी लागणारा सर्व खर्च करण्याची जबाबदारी आयुक्तांनी स्विकारल्याने यावेळी अश्विनीच्याही डोळ्यातून आनंदाश्रू निघाले. दिवेगावकर यांनी या मुलीचे पालकत्व स्विकारून इतरांसमोरही वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

महाविद्यालयाला पत्र अन वसतिगृहाला फोन

आयुक्त दिवेगावकर पालकत्व घेवून थांबले नाहीत. तर त्यांनी अश्विनीला राजर्षी शाहू महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश द्यावा असेपत्रही दिले आहे. अश्विनीची परिस्थिती लक्षात घेता ती घऱी राहिली तर शिक्षणात अडथळे येतील हे लक्षात घेवून, दिवेगावकर यांनी येथील वेदिका गर्ल्स हॉस्टेलचे प्रवीण सावंत यांच्याशी संपर्क साधला. अश्विनीच्या राहण्याची व भोजनाची सोय करण्याची विनंती केली.  सावंत
यांनी देखील तातडीने ही विनंती मान्य केली. त्यामुळे आता अश्विनी पुढे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकारण्याचेच काम राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com