एटीएममध्ये खडखडाट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

औरंगाबाद - नोटाबंदीचा फटका पगारदार, पेन्शनधारकांना बसत असून पगार होऊन बहुतांश जणांचा खिसा मात्र रिकामाच आहे. रविवारी सुटीच्या दिवशी खरेदीचा मूड असलेल्यांचा एटीएममध्ये खडखडाट असल्याने चांगलाच हिरमोड झाला.

औरंगाबाद - नोटाबंदीचा फटका पगारदार, पेन्शनधारकांना बसत असून पगार होऊन बहुतांश जणांचा खिसा मात्र रिकामाच आहे. रविवारी सुटीच्या दिवशी खरेदीचा मूड असलेल्यांचा एटीएममध्ये खडखडाट असल्याने चांगलाच हिरमोड झाला.

नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये सध्या कॅश उपलब्ध नसल्याने बॅंका संकटात सापडलेल्या आहेत. रिझर्व्ह बॅंकेकडे मागणी नोंदवूनही पैसाच येत नसल्याने बॅंकांबरोबर एटीएममध्येसुद्धा आता खडखडाट आहे. रविवारी सुटीच्या दिवशी अनेक जण पैसे काढण्यासाठी आले होते. मात्र, बहुतांश एटीएम रिकामेच असल्याने त्यांना रिकामा खिसा घेऊन जावे लागले. एटीएमच्या बाहेर नो कॅश असे बोर्ड लावण्यात आले होते. तर काही एटीएमची दारे बंद करण्यात आली. फक्त बोटावर मोजण्याइतपत एटीएममध्ये पैसे उपलब्ध होते. त्यातही फक्त दोन हजारांची नोट उपलब्ध होती. दोन हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम काढण्याऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

सोमवारी झुंबड होण्याची शक्‍यता
रविवारी बॅंका बंद राहिल्यानंतर सोमवारी खातेदारांची बॅंकांमध्ये गर्दी होण्याची शक्‍यता आहे. बहुतांश जणांचा पगार झाल्याने तसेच एटीएममध्ये पैसेच नसल्याने अनेक जण बॅंकेत येण्याची शक्‍यता आहे; मात्र बॅंकांकडे पुरेशी कॅशच नसल्याने या खातेदारांना पैसा मिळणार का, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

मराठवाडा

औरंगाबाद : हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. 18) बंजारा समाजातर्फे क्रांती चौक...

02.30 PM

फुलंब्री (औरंगाबाद) : शासनाने तात्काळ पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी औरंगाबाद-जळगाव या राज्य महामार्गावर...

02.12 PM

सर्वजण आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यातील रहीवासी नांदेड : नांदेड-हैदराबाद महामार्गावर मोटारीने ट्रकला समोरून जोरदार धडक दिली...

01.57 PM