मुलीच्या गळ्याला चाकू लावून महिलेवर अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

बीड - दीड वर्षाच्या मुलीच्या गळ्याला चाकू लावून महिलेवर अत्याचार केल्याची घटना मातोरी (ता. शिरूर) येथे मंगळवारी उघडकीस आली. यातील आरोपी फरारी असून या प्रकरणी घटनेच्या तीन आठवड्यानंतर चकलांबा (ता. गेवराई) ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

बीड - दीड वर्षाच्या मुलीच्या गळ्याला चाकू लावून महिलेवर अत्याचार केल्याची घटना मातोरी (ता. शिरूर) येथे मंगळवारी उघडकीस आली. यातील आरोपी फरारी असून या प्रकरणी घटनेच्या तीन आठवड्यानंतर चकलांबा (ता. गेवराई) ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

मातोरी येथील 21 वर्षीय पीडित महिलेचे सासू-सासरे शेतात राहतात, तर ही महिला तिच्या दीड वर्षांची मुलगी व पतीसमवेत गावात वास्तव्यास आहे. 3 एप्रिलला पाथर्डी तालुक्‍यातील मिडसांगवी येथील यात्रेसाठी तिचा पती गेला होता. पीडित महिला दीड वर्षांच्या मुलीसमवेत घरी एकटीच होती. ही संधी साधून रात्री 11 वाजता गावातीलच रियाज इस्माईल शेख याने महिलेच्या घरी जाऊन त्याने दरवाजा ठोठावला. पती आला असावा म्हणून पीडितेने दरवाजा उघडला. त्या वेळी रियाज शेखने तिला आत ढकलले. तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने तिचे तोंड दाबले. त्यानंतर झोपेत असलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीच्या गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणी चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी फरारी आहे. 

पतीच्या बोटाला घेतला चावा 
दरम्यान यात्रेवरून पती घरी परतल्यावर त्याने रियाज शेखचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आरोपीने त्याच्या बोटाला चावा घेत पळ काढला. बदनामीच्या भीतीने सुरवातीला महिलेने व तिच्या पतीने कसलीही तक्रार दिली नाही; मात्र तीन आठवड्यानंतर पीडित महिलेने आरोपीविरुद्ध फिर्याद देत गुन्हा नोंदविला. 

टॅग्स