औरंगाबाद विभागात बारावीचा निकाल 88.74 टक्के

सुषेन जाधव
बुधवार, 30 मे 2018

विभागातून 1 लाख 59 हजार 452 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातून प्रविष्ट झालेल्या 1 लाख 59 हजार 086 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 41 हजार 173 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रु/मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकाल बुधवारी (ता. 30) लागला. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकाल 1.09 टक्‍क्‍यांनी कमी लागला आहे. औरंगाबाद विभागाचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला लागला आहे. यात परभणी जिल्ह्याचा सर्वाधिक म्हणजेच 89.90 टक्के निकाल लागला आहे. 

औरंगाबाद विभागांतर्गत असणारे औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, हिंगोली, आणि बीड या पाच जिल्ह्यात 1 हजार 181 विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये आहेत. बारावीची लेखी परिक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान विद्यार्थ्यांनी 374 परिक्षा केंद्रावर ही परिक्षा घेण्यात आली होती. 

विभागातून 1 लाख 59 हजार 452 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातून प्रविष्ट झालेल्या 1 लाख 59 हजार 086 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 41 हजार 173 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. अशी माहिती प्रभारी विभागीय अध्यक्ष तथा सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.

जळालेल्या उत्तरपत्रिकाबद्दल बोर्ड निशब्द -
परीक्षेनंतर बीड जिल्ह्यात दोन शिक्षकांच्या वादात उत्तरपत्रिका जळाल्याचे समोर आले होते. एकंदरीत दोन्ही शिक्षकांबरोबरच या एकूणच प्रकाराबद्दल काय चौकशी केली आणि कोणावर काय कारवाई केली यावर मात्र बोर्डातील एकही अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत. विभागीय अध्यक्षा श्रीमती पुन्ने यांनी संबंधितांवर बोर्डाने कारवाई करण्याची शिफारस केली असून प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत सारवासारव केली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: In Aurangabad division the result of HSC is 88.74 percent