औरंगाबाद - युवा महोत्सवाचे अभिनेते सुबोध भावेंच्या हस्ते उदघाटन

subodh-bhave
subodh-bhave

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन सिनेअभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते बुधवारी (ता.२६) करण्यात आले. 

यावेळी अभिनेता उमेश जगताप, कुलगुरू डॉ बी ए चोपडे, प्र-कुलगुरू अशोक तेजनकर कुलसचिव साधना पांडे, संचालक मुस्तजीब खान, डॉ सुधाकर शेंडगे, डॉ दासू वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

या युवक महोत्सवात 226 महाविद्यालयांच्या  1185 विद्यार्थी व 966 विद्यार्थिनी सहभाग नोंदवनारआहे. 38 कलाप्रकारांचे सादरीकरण या महोत्सवात होणार आहे. नाट्यशास्त्र विभागाच्या शेजारी उभारलेल्या स्टेज क्रमांक एक -सृजनरंग येथे हा समारंभ पार पडला. काही संघटना या उद्घाटन समारोह उधळणार असल्याची शक्यता असल्याने मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

शोभायात्रा उत्साहात
केंद्रीय युवक महोत्सव 2018 च्या शोभायात्रेला बुधवारी सकाळी साडे दहा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यापीठातील पुतळ्यापासून उत्साहात सुरुवात झाली. दरम्यान, टाळ मृदुंग, संबळ, तुणतुणे, डफडे, ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत  विविध वेशभूषा करून कलाप्रकारांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक प्रश्न मांडत समाज जनजागृतीचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले.

डिजेवर थिरकली तरुणाई
महोत्सवाच्या उदघाटनापूर्वी शोभायात्रा सृजनरंग येथे पोहचली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. पोलिसांसमोरच डीजे सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनीही बेभान होऊन नाचायला सुरुवात केली. विद्यार्थी तासभर डिजेवर मनमुराद नाचत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com