सावधान... एटीएमवरून पैसे काढताय? रांगेत भामटेही असू शकतात

मनोज साखरे
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

  • तुमच्या मागे रांगेत भामटेही असू शकतात
  • 'यूपी'हरियाणाच्या टोळीचा औरंगाबादेत पर्दाफाश
  • दोन वर्षात हडपले 50 लाख रुपये

औरंगाबाद : तुम्ही जर एटीएम मशीन मधून पैसे काढत असाल तर सावधान..एटीएम केंद्रात भामटे असू शकतात. एटीएम कार्डची अदलाबदल करून व तुमचा पिन मिळवून परस्पर पैसे काढू शकतात. अशाच हरियाणा, उत्तरप्रदेशच्या एका टोळीला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडे विविध बँकांची तब्बल सत्तर एटीएम सापडली आहेत. यातून त्यांनी पन्नास लाख रुपये हाडपल्याची माहिती पोलिस अधीक्षक आरती सिंह यांनी दिली.

शैलेंद्र सिंह घिसाराम, राजेश सतविरसिंह (रा, दिल्ली), बाळाराम गजेसिंह, विनोदसिंह गजेसिंह अशी चौघा भामट्याची नावे आहेत. त्यांचे उत्तरप्रदेशातील दोन साथीदार पसार आहेत.
शहरातील रंगनाथ मस्के हे विजापूरला भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी 9 सप्टेंबरला गेले. त्यावेळी एटीएम मशीनमधून कार्ड स्वॅप करूनही पैसे निघत नव्हते, त्यांच्या मागे उभ्या एका तरुणाने परत कार्ड स्वॅप करायला लावून मस्के यांच्याकडून कार्ड त्याच्या हातात घेतले. त्यानंतर पिन टाकायला सांगितले. या वेळेत त्याच बँकचे त्याच्याकडील असलेले कार्ड मस्के याना दिले व एंटर केलेला पिन हेरून तो पसार झाला. यानंतर त्याने एटीएममधून 77 हजार रुपये लांबवले. अशीच मोडस वापरून त्याने व त्याच्या साथीदारांनी दोन वर्षात 50 लाख रुपये हडपल्याची माहिती आरती सिंह यांनी दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :