बंजारा समाजाचा औरंगाबादेत विशाल आक्रोश मोर्चा

शेखलाल शेख
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

औरंगाबाद : हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. 18) बंजारा समाजातर्फे क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत विशाल मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारो बंजारा बांधवांनी सहभाग घेतला. 

हनुमंतखेडा (ता.सोयगाव) घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा.

पीडित मुलीच्या कुटुंबाची बाजू मांडण्यासाठी ऍड. उज्ज्वल निकम यांची राज्य शासनाने नियुक्ती करावी. मनोधैर्य योजनेत मृत मुलीच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत देण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :