औरंगाबाद जिल्ह्यात दीड हजार गावांत पाण्यासाठी भटकंती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

महावितरणने कापला पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा

औरंगाबाद - महावितरणने ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना पाणीपुरवठ्यासाठी केलेल्या वीज कनेक्‍शनपोटी प्रचंड थकबाकी वाढल्याने औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दीड हजार गावांच्या पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. पाणीपुरवठा बंद झाल्याने हजारो नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. 

महावितरणतर्फे औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी दोन हजार ३७७ वीज कनेक्‍शन दिलेले आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालये थकबाकी भरत नाही, वारंवार मागणी करूनही बिल भरण्यात येत नाही. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठ्याची थकबाकी तब्बल ३७ कोटी रुपयांवर गेली आहे. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर, गेल्या महिनाभरात केवळ १२७ ग्रामपंचायतींनी ३२ लाख रुपयांचा भरणा केला आहे. थकबाकी भरली जात नसल्याने महावितरणने एक हजार ४५७ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याची वीज तोडली आहे. पाणीपुरवठ्याची वीज तोडल्याने या गावातील नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे.