सोळा अंगणवाड्या होणार हायटेक

सोळा अंगणवाड्या होणार हायटेक

औरंगाबाद - अंगणवाडी म्हणजे ग्रामीण भागात फक्‍त खाऊची शाळा म्हणून ओळखली जाते; मात्र या खाऊच्या शाळांना हायटेक करून वेगळी ओळख मिळणार आहे. विविध नावीन्यपूर्ण साधनांच्या मदतीने अंगणवाडीतील मुलांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकासाची पातळी वाढवणे, त्यांना गुणवत्तापूर्वक पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था व युनायटेड वे ऑफ मुंबई या संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मोंसॅंटो इंडिया पुरस्कृत अंकुर प्रकल्पांतर्गत अंगणवाड्या हायटेक करण्यासाठी फुलंब्री तालुक्‍यातील १६ अंगणवाड्यांची निवड करण्यात आली आहे. 

या माध्यमातून अंगणवाड्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. अंगणवाड्या हायटेक करण्यासाठी लोकसहभाग घेऊन तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचा बौद्धिक विकास करण्यासाठी अंकुर प्रकल्प राबवण्यात येत आहे. यासाठी दिल्ली गेट येथील महिला सबलीकरण केंद्रात दोन दिवसांचे नुकतेच प्रशिक्षण घेण्यात आले. मास्टर ट्रेनर सुनीता सनान्से, सुनीता दहिहंडे यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणाचे उद्‌घाटन युनायटेड वे ऑफ मुंबईचे मुकेश मोहोड यांनी केले. या वेळी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे सचिव अप्पासाहेब उगले, जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम व अंगणवाडी सेविकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्री. कदम म्हणाले, ‘‘अंकुर प्रकल्प स्तुत्य उपक्रम आहे. त्याचा अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीच्या उपयोगितेसाठी वापर करून घ्यावा. भविष्यात प्रशिक्षणातील १६ अंगणवाडी सेविका व सात सुपरवायजर या जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर बनतील. जिल्हास्तरावर हा उपक्रम पुढे विस्तारित व्हावा, यासाठी प्रयत्न करावे’’, असे आवाहन त्यांनी केले. या प्रशिक्षणासाठी फुलंब्री तालुक्‍याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र कड पाटील यांनी विशेष सहकार्य केले. प्रकल्प व्यवस्थापक  अन्नपूर्णा ढोरे यांनी सूत्रसंचालन केले.

प्रशिक्षण कार्यक्रमासाठी गणेश उगले, सुनील पवार, सिद्धार्थ खरात, नलिनी पाटील, सुरेखा जाधव, सारिका जाधव, मनीषा जाधव, संगीता रंधवे, दीपाली धीवर, निधी त्रिभुवन यांनी पुढाकार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com