आधारकार्ड अपग्रेड करायचे तर चला पोस्टात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

टपाल खात्यातर्फे विभागात २० आधार सुधार केंद्र सुरू 

औरंगाबाद - आपल्या आधार कार्डवरील जन्म तारीख अपग्रेड करण्यासह इतर काही दुरुस्ती करायची असल्यास ती तुमच्या जवळच्या पोस्ट कार्यालयातून आता करता येणार आहे. भारतीय टपाल खात्यातर्फे औरंगाबाद विभागात २० आधार सुधार केंद्रे (आधार अपग्रेडेशन सेंटर) मंगळवारपासून (ता.१८) सुरू करण्यात आली आहेत. यामुळे आधार कार्डवरील दुरस्ती करणे आता सोपे झाले आहे. 

मुख्य टपाल कार्यालयात पोस्ट मास्टर जनरल प्रणव कुमार यांच्या हस्ते आधार सुधार केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. आधार कार्डवरील  नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीसह विविध दुरुस्ती आता येथून करता येणार आहे. यासाठी २५ रुपये प्रत्येक दुरुस्ती खर्च लागणार आहे. विशेष म्हणजे केवळ पाच ते सात तासात ग्राहकांना ही दुरुस्ती करून मिळणार आहे. सध्या २० केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. लवकरच  अंबड, जालना, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, जळगाव, धुळे या जिल्ह्यातील मुख्य टपाल कार्यालयात ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असेही श्री. प्रणव कुमार यांनी सांगितले. 

राखीसाठी विशेष लिफाफा लाँचिंग 
टपाल खात्यातर्फे रक्षाबंधनाचे औचित्य साधत वॉटरप्रूफ लिफाफा लाँच करण्यात आला आहे. हा लिफाफा पोस्टमन विक्री करणार आहे. दहा रुपयांत हा लिफाफा विक्री करण्यात येणार असून, रक्षा-बंधनानिमित्त शाळा, महाविद्यालय परिसरात या लिफाफ्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. राखी सुरक्षितरीत्या पोहचविण्यासाठी हा लिफाफ्याचे लाँचिंग करण्यात आले असल्याचेही प्रणव कुमार यांनी सांगितले.

मराठवाडा

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील कुत्री पकडण्याचा विषय थेट दिल्लीपर्यंत गेला असून, केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी याप्रकरणी...

01.39 AM

समाजवादी पक्ष महापालिकेच्या ५० जागा लढविणार नांदेडः सद्या देशाची अवस्था वाईट असून, धर्माच्या नावाने सत्तेत आलेले भाजप गाय व...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017