ऑनलाईन सीईटीमुळेच प्रवेशास विलंब झाल्याचे कुलगुरूंना मान्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रवेश प्रक्रिया रविवारी आणि इतर सुटीच्या दिवशीही राबविण्यात येणार आहेत. तसे आदेशच कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिले आहेत. दरम्यान, पदव्युत्तरसाठी सीईटी आणि ऑनलाईन प्रक्रियेमुळेच प्रवेशास विलंब झाल्याचे कुलगुरूंनी मान्य केले.

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रवेश प्रक्रिया रविवारी आणि इतर सुटीच्या दिवशीही राबविण्यात येणार आहेत. तसे आदेशच कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिले आहेत. दरम्यान, पदव्युत्तरसाठी सीईटी आणि ऑनलाईन प्रक्रियेमुळेच प्रवेशास विलंब झाल्याचे कुलगुरूंनी मान्य केले.

पदव्युत्तर विभागातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकांची शनिवारी (ता. १९) महात्मा फुले सभागृहात बैठक झाली. या वेळी विशेष कार्यसन अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे, अधिष्ठाता उपस्थित होते. या प्रक्रियेच्या नियोजनासाठी डॉ. रत्नदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत चारही अधिष्ठातांसह डॉ. एस. आर. रेड्डी, डॉ. धनश्री महाजन, डॉ. गीता पाटील, डॉ. महेंद्र सिरसाठ, डॉ. वैशाली खापर्डे यांचा समावेश आहे.

पहिल्या यादीत प्रवेश फ्रीज केलेल्या आणि दुसऱ्या यादीत प्रवेश वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २३ ऑगस्टदरम्यान सायंकाळी साडेपाचपर्यंत संबंधित विभागात, महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी विद्यापीठ विभाग व महाविद्यालये सुटीच्या दिवशीही सुरू राहतील.

स्पॉट ॲडमिशन गुरुवारी
विद्यार्थ्यांनी स्पॉट ॲडमिशनसाठी २४ ऑगस्टला विद्यापीठातील संबंधित विभागात विहित नमुन्यातील अर्ज सकाळी ११ ते दुपारी दोनपर्यंत जमा करावेत. पूर्वी प्रवेशपूर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याची आवश्‍यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व परीक्षा दिली नाही त्यातील खुल्या प्रवर्गासाठी ३०० रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी दोनशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्याचदिवशी दुपारी चार वाजता गुणवत्ता, संवर्गनिहाय यादी लावली जाईल. त्यानंतर समुपदेशन आणि स्पॉट ॲडमिशनला सुरवात होणार आहे. जे विषय, विभाग हे विद्यापीठ परिसरात नाहीत, त्यांनी युनिक सेंटरमध्ये प्रक्रिया पार पाडावी. प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयांत, विभागांत विद्यार्थ्यांनी २६ ऑगस्टला सायंकाळी साडेपाचपर्यंत प्रवेश निश्‍चित करावा, असे आवाहन डॉ. सरवदे यांनी केले.

मराठवाडा

औरंगाबाद  : यंदा वेळेवर व भरपूर पाऊस पडणार, असा हवामान विभागाने अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी वेळीच मशागत केली होती....

10.09 AM

पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. सद्यस्थितीत ३० हजार क्युसेक वेगाने पाणलोट क्षेत्रातुन...

09.48 AM

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील कुत्री पकडण्याचा विषय थेट दिल्लीपर्यंत गेला असून, केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी याप्रकरणी...

01.39 AM