गॅस छोडो, चुल्हा जलाओ; मोटार छोडो सायकल चलाओ’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - ‘गॅस छोडो, चुल्हा जलाओ, मोटार छोडो सायकल चलाओ, तीन साल में क्‍या किया, मन की बात में वक्त गया’ अशी घोषणाबाजी करीत काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. १८) पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. 

औरंगाबाद - ‘गॅस छोडो, चुल्हा जलाओ, मोटार छोडो सायकल चलाओ, तीन साल में क्‍या किया, मन की बात में वक्त गया’ अशी घोषणाबाजी करीत काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. १८) पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. 

काँग्रेस कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात रस्त्यात चूल मांडून सरकारचा निषेध केला. देशात उसळलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘मोदी तेरे शासन में, जनता लूट गयी राशन में’, ‘परेशान जनता करे पुकार.., मत कर मोदी अत्याचार’, ‘गॅस-पेट्रोल-डिझेल दरवाढीचा धिक्कार असो’, ‘वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू, महंगा तेल.’ ‘भारनियमन रद्द करा, शेतकऱ्यांना मोफत वीज द्या’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 

मोदींच्या परदेश दौऱ्यांचा खर्च भागविण्यासाठी ही दरवाढ केली गेली आहे, दरवाढीतून मिळणाऱ्या वाढीव उत्पन्नातून हा खर्च भागविण्यात येत आहे, असा आरोप शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी केला.  निदर्शनात प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंग सोधी, ज्येष्ठ कार्यकर्ते पृथ्वीराज पवार, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील, सुरेखा पानकडे, खालेद पठाण, आतिष पितळे, सचिन पवार, बाबा तायडे, सरताज खान, प्रभाकर मुठ्ठे पाटील, लियाकत पठाण, गटनेते भाऊसाहेब जगताप, नगरसेवक सोहेल खान, ॲड. इकबालसिंग गिल, इब्राहिम पटेल, अब्दुल नवीद, सुभाष देवकर, योगेश मसलगे पाटील, अनिल माळोदे, सत्तार खान, संतोष दीडवाले, अय्युब खान, महिला काँग्रेसच्या अर्चना मुंदडा, सुनीता तायडे, वैशाली तायडे, सुनीता निकम, वर्षा पवार, पंकजा माने सहभागी झाले होते.

गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर  
आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली. परभणी व नांदेड येथील काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौऱ्यावेळी शहरातून दोन हजार पदाधिकारी नांदेडला गेले होते. जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार व त्यांच्या समर्थकांनी क्रांती चौकातील आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने ते पुन्हा सिद्ध झाले आहे.

चिकलठाण्यात आज ‘रास्ता रोको’ 
याच विषयावर माजी आमदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली जालना रोडवर केंब्रिज शाळेजवळ मंगळवारी (ता. १९) सकाळी दहा वाजता ‘रास्ता रोको’ व निदर्शने करण्यात येणार आहेत. या वेळी कार्यकर्त्यांनी हजर राहावे, असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामराव शेळके, जगन्नाथ काळे, पंचायत समितीचे सभापती कैलास उकिरडे, नगरसेवक भाऊसाहेब जगताप, शेख सोहेल, मोहन साळवे, कारभारी जाधव आदींनी केले आहे.

पेट्रोल दरवाढीविरुद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निदर्शने
औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑइलचे दर घसरले असतानाही पेट्रोल, डिझेलच्या किमतींत रोज वाढ सुरूच आहे. या विरोधात सोमवारी (ता. १८) दुपारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पैठण गेट येथे निदर्शने करण्यात आली. 

या वेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारचा निषेध करीत ‘भाजप सरकार हाय हाय’ ‘अब की बार जेब पे वार’ अशा जोरदार घोषणा दिल्या.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक विजय साळवे, प्रदेश सरचिटणीस अभिषेक देशमुख, संदीप शेळके, विक्‍की चावरिया, पंकज जाधव, सुनील क्षीरसागर, विनोद पगारे, किशोर विटेकर, अब्दुल अलिम, जावेद खान, अतुल बीडकर, अनिल जाधव, राजेंद्र वाघमारे, प्रथमेश पाटील, राजेंद्र ढेपले, गजानन पाटील, मोबीन शेख, अक्षय घुले, राज आव्हाड, प्रफुल्ल पाटील, वैभव बेडके, रवी जाधव, विक्‍की बनसोडे, कैलास सुरसे, मयूर चौधरी, नीलेश मताकर, अजित कासार, रामेश्‍वर राठोड सहभागी होते.