‘ऑलआऊट’मध्ये पोलिसच आऊट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटसमोर मंगळवारी (ता. १२) सायंकाळी पोलिसांनी ‘ऑलआऊट ऑपरेशन’ राबविले. ज्या नागरिकांची वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली; त्यांना छावणीत पाठविले. मात्र, कारवाईच्या ठिकाणी पोलिसांनी ‘एलटीएम’ पावती न दिल्याने कारवाई संपल्यानंतरच दंडाचे सोपस्कर पार पडले. यात तब्बल तीन तासांचा कालावधी गेल्याने महिला, विद्यार्थी, नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात संपात व्यक्‍त केला.

विद्यापीठातून विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्याच्या बाहेर पाडायच्या वेळेतच गेटसमोर पोलिसांनी ऑलआऊट ऑपरेशन सुरू केले. यात ज्यांच्याकडे हेल्मेट नव्हते, त्या वाहनांची चावी काढत वाहन परवाना, कागदपत्रांची विचारणा केली. ज्यांनी तत्काळ पूर्तता केली नाही ती वाहने पोलिसांनी छावणी पोलिस ठाण्यात नेली. जागेवरच पैसे भरतो, वाहन सोडा, असे नागरिक सांगत होते. मात्र, तुमची वाहने छावणी पोलिस ठाण्यात नेली आहेत. तिथे दोनशे रुपयांची पावती करून वाहन सोडवून घ्या, असे पोलिसांतर्फे नागरिकांना सांगण्यात आले. शंभराहून अधिक लोकांची वाहने जप्त केल्याने सर्वच्या सर्व नागरिक पैसे भरण्यासाठी छावणी पोलिस ठाण्यात आले. तिथे वाहतूक पोलिसांकडे पैसे भरण्यासाठी विचारणा केली.

त्या वेळी कारवाईच्या ठिकाणच्या पोलिसांनी तुम्हाला दिलेली ‘एलटीएम’ पावती द्या, असे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी कुणालाच या प्रकारची पावती दिली नव्हती. दरम्यान, पोलिसांची कारवाई सुरूच होती. ती संपल्यानंतर कारवाईच्या ठिकाणचे पोलिस आले. त्यानंतर वाहन परवान्याची झेरॉक्‍स, एलटीएम पावती जोडून नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला. घरी जाण्याच्या वेळेतच कारवाई सुरू झाल्याने नागरिकांना तब्बल अडीच ते तीन तास ताटकळत बसावे लागले. यात नागरिकांनी संताप व्यक्‍त केला. गैरसोयीनंतर पोलिसांकडून महिलांना सूट देण्यात आली.

वाहतूक पोलिसांची अरेरावी
विद्यापीठातील एका विभागाच्या प्रमुखांनी सीटबेल्ट न लावल्याने त्यांचा वाहन परवाना जप्त केला. त्यांना छावणी पोलिस ठाण्यात जाऊन पावती घेण्यास सांगितले. ते स्वत:च वाहन घेऊन तिथे गेले, तर त्यांना एलटीएम पावती न मिळाल्याने कारवाई संपण्याची वाट पाहावी लागली. दरम्यान, वाहतूक पोलिस कर्मचारी श्री. आडे यांनी अडवणूक करीत ती पावती आणि वाहन परवाना स्वत:च्याच खिशात ठेवली होती. याच वेळी विभागप्रमुखांची आई आजारी असल्याने त्यांना लवकर घरी जायचे होते. त्यांच्या आई वारंवार फोन करीत असल्याने त्यांनीही पोलिस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

Web Title: aurangabad marathwada news allout operation by police