अद्ययावत ॲन्ड्रॉईडला युवकांची पसंती

विकास व्होरकटे 
मंगळवार, 25 जुलै 2017

मोबाईल जगतातल्या नव्या ट्रेंडची तरुणाईला भुरळ

मोबाईल जगतातल्या नव्या ट्रेंडची तरुणाईला भुरळ

औरंगाबाद - माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल दिवसेंदिवस अद्ययावत होत आहेत. त्यामुळे अत्याधुनिक ॲन्ड्रॉईड मोबाईल लहानग्यांपासून मोठ्यांना भुरळ घालतात. आधुनिक फिचर्सनी आजचा मोबाईल अपडेट झाला आहे. शिवाय कमी किंमतीत जास्त फिचर्स देणारे मोबाईल बाजारात उपलब्ध असल्याने मोबाईल जगतात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. बदलत्या ट्रेंडमध्ये आज कमी किंमतीत आकर्षक व्हर्जन, सुविधा आणि फॅन्सी लूक असणाऱ्या मोबाईलला युवकांची पसंती आहे. सध्या बाजारात नव्याने दाखल होणाऱ्या पण नानाविध फिचर्स देणाऱ्या मोबाईलला युवकांची पसंती आहे. विवो, मायक्रोमॅक्‍स, मोटोरोला, ॲपल, ॲसूस यासारख्या अनेक कंपन्यांनी मोबाईलमध्ये क्रांतिकारी बदल करून अद्ययावत फोन बाजारात आणले आहेत. 

जीएसटीमुळे सॅमसंगच्या किंमतीत घट - 
सॅमसंग कंपनीचा ‘जी सेवन नेक्‍स्ट’, ‘जे सेवन मॅक्‍स’, ‘जी सेवन प्राईम’, ‘जी सेवन सिरीस’, ‘प्राईम प्रो’ या फोनला युवकांची पसंती मिळत आहे. सहा हजारांपासून ते ऐंशी हजार रुपयांपर्यंत हे फोन बाजारात उपलब्ध आहेत. जीएसटीमुळे सॅमसंग फोनच्या किंमतींमध्ये पाचशे ते सातशे रुपयांनी घट झाली आहे.

जिओनीने रोवले पाय 
विवो, रेडमी, ओप्पोबरोबर जिओनीनेही बाजारात पाय रोवले आहेत. जिओनीच्या पंधरा ते वीस हजार रुपयांमध्ये मिळणाऱ्या फोनला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये जिओनी ए-१ ॲन्ड्रॉईड ७.०, ए-१ गोल्ड, ए-१ ग्रे या मोबाईलचा समावेश आहे.

उच्च वर्गांची पसंती आयफोनला 
आयफोन-६, आयफोन-५ एस, आयफोन- ७ प्लस यासह अनेक आकर्षक हॅंडसेटला युवकांची पसंती आहे. ‘पैसा जाईल पण हौस होईल’ म्हणणारे युवक सुमारे २५ पासून ८० हजार रुपयांपर्यंतचे आयफोन खरेदी करतात.

या बाबींना अधिक प्राधान्य

फोरजी मोबाईल तीन ते चार जीबी रॅम 

इंटर्नल स्टोरेज - १६, ३२, ६४ जीबी 

पाच इंचापेक्षा अधिक स्क्रीन साईज 

अधिकाधिक बॅटरी कॅपेसिटीला महत्त्व 

दहा मेगापिक्‍सेलपेक्षा अधिक बॅक व फ्रंट कॅमेरा

व्हर्जन (६.०), (७.०),ॲन्ड्रॉईड एक्‍स, नॅकोड, मार्चमेलो