सामाजिक जाणिवेतून लेखन व्हावे - अरुण करमरकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

औरंगाबाद - 'सद्यःस्थितीत बधिर झालेल्या समाजजीवनात पत्रकारांनी सामाजिक जाणिवेतून लेखन करावे,'' असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी केले. विश्‍व संवाद केंद्रातर्फे दिले जाणारे "आद्य वार्ताहर देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार' रविवारी (ता. चार) यशोमंगल कार्यालयात श्री. करमरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, 'नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर समाजकारणांत मोठे बदल होत आहेत. सामान्य माणसांचा आवाज धोरणकर्त्यांपर्यंत पोचू दिला जात नाही, चळवळी थंड पडत आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. योग्य त्या भूमिकेतून याची मांडणी व्हायला हवी,'' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

या वेळी यंदाचा पुरस्कार लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर, हिंगोली येथील "सकाळ'चे जिल्हा बातमीदार प्रकाश सनपूरकर, अंबड तालुक्‍यातील संतोष जिगे यांना देण्यात आला; तर यंदापासून महिला पत्रकाराचाही सन्मान करण्याचे ठरवले होते. त्यानुसार आरतीश्‍यामल जोशी यांचा; तर वृत्तपत्रांतून सातत्याने विविध विषयांवर लेखन करणाऱ्या पत्रलेखकांमधून शरद लासूरकर यांचाही या वेळी गौरव करण्यात आला. या वेळी पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाला विश्‍व संवाद केंद्राचे अध्यक्ष कुलभूषण बाळशेटे, अंजली कोंडेकर उपस्थित होते.