आता ‘घाटी’त करा रक्त कर्करोगाची चाचणी

औरंगाबाद - ‘घाटी’त फ्लो सायटोमीटर यंत्राचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. सुरेश बारपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर, डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. राजन बिंदू, डॉ. भारत सोनवणे, डॉ. ए. आर. जोशी.
औरंगाबाद - ‘घाटी’त फ्लो सायटोमीटर यंत्राचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. सुरेश बारपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर, डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. राजन बिंदू, डॉ. भारत सोनवणे, डॉ. ए. आर. जोशी.

औरंगाबाद - रक्ताच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी ‘घाटी’त आलेल्या रुग्णांची चाचणी खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये करावी लागत होती; मात्र आता ही चाचणी घाटीतच अल्प दरात करता येणार आहे. त्यासाठी लागणारे ऐंशी लाख रुपयांचे फ्लो सायटोमीटर या यंत्राचे वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. सुरेश बारपांडे यांच्या हस्ते रविवारी (ता. दहा) लोकार्पण करण्यात आले.

घाटीच्या महात्मा गांधी सभागृहात ‘रक्त कर्करोगांच्या तपासण्या’ या विषयावर रविवारी एकदिवसीय कार्यशाळा झाली. त्यानंतर या यंत्राचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विभागप्रमुख डॉ. राजन बिंदू, अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, डॉ. ए. आर. जोशी, डॉ. मंजूषा शेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी डॉ. बारपांडे म्हणाले, ‘‘विविध उपकरणे आणि यंत्रसामग्री उपचारांना दिशा देण्यात मोलाचे काम करते; मात्र डॉक्‍टरांनी यंत्रांवर तपासण्या करताना आपले निदान केवळ यंत्रांवर अवलंबून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. अनुभव आणि ज्ञानाचा पुरेपूर वापर करावा. शासकीय सेवेत दाखल दर्जेदार यंत्रसामग्रीचा रुग्णसेवेसाठी चांगला उपयोग करावा,’’ असा सल्ला त्यांनी दिला. डॉ. जोशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मंजूषा ढवळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शुभज्योती पोरे यांनी आभार मानले. कार्यशाळेत डॉ. सुनीता पाटील, डॉ. प्रगती फुलगीरकर, डॉ. अंजली कुलकर्णी यांचा सहभाग होता.  

मुंबईच्या खेट्या टळणार
रक्त कर्करोगाचे निदान करणारे हे यंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या यंत्रणेत उपलब्ध झाले. हे मराठवाड्यातील पहिले यंत्र आहे. घाटीत दर आठवड्याला दहा ते बारा रुग्णांना कर्करोगाची चाचणी करावी लागते. यापूर्वी मुंबईत ही चाचणी करण्यासाठी पाठवावे लागत होते; मात्र आता इथेच अत्यल्प दरात चाचणी करता येणे शक्‍य होईल. त्याचा लाभ गोरगरीब रुग्णांना होणार आहे, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. राजन बिंदू यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com