आठ लाख मागणे महागात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

एमआयडीसी वाळूजचे सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक निलंबित

औरंगाबाद - सहायक पोलिस निरीक्षकाने उपनिरीक्षकाशी संधान साधून एका मोठ्या कंपनीतील भंगाराच्या ट्रकवर कारवाई टाळण्यासाठी आठ लाख रुपये मागितल्याचे प्रकरण समोर आले. हे प्रकरण दोन पोलिस अधिकाऱ्यांवर चांगलेच शेकले. त्यांना पोलिस आयुक्तांनी निलंबित केले. बुधवारी (ता. २१) त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले.

संशयित आरोपीने ठाण्यातच गळफास घेतल्याच्या प्रकरणात एमआयडीसी, वाळूज ठाण्याचे निरीक्षक नाथा जाधव तसेच नीळ आणि मुंजाळ या दोन कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर सहायक निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांच्याकडे प्रभार देण्यात आला होता.

दुसऱ्याच दिवशी सहायक निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत, उपनिरीक्षक ताहेर पटेल यांना निलंबित करण्यात आले. एका कंपनीतून भंगार साहित्य घेऊन दोन ट्रक वाळूज एमआयडीसी भागात आले. त्या ट्रकला १९ जूनला एमआयडीसी पोलिसांनी पकडले. पकडल्यानंतर दोन दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांनी ट्रकवर कायदेशीर कारवाई करणेच अपेक्षित होते; पण त्यांनी तसे केले नाही. या प्रकरणाची माहिती पोलिस आयुक्तांपर्यंत पोचली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याची गोपनीय चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीअंती सहायक निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत व उपनिरीक्षक ताहेर पटेल यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. ते जबाबदार असल्याचा अहवाल आयुक्तांना सादर केल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. वाळूज ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्याकडे प्रभारी ठाणेदाराचा पदभार दिला आहे.

दीड लाखात तोडपाणी..
सूत्रांनी सांगितले, की पकडलेल्या भंगाराच्या ट्रकची ठाण्यात नोंद करून रेकॉर्ड तयार करणे आवश्‍यक होते; पण दोघांनी कुठलीच नोंद घेतली नाही. विशेषत: सेटलमेंटसाठी पुढाकार घेऊन आठ लाखांची मागणी केली. त्या वेळी ट्रक चालकांनी एवढी रक्कम नसल्याने नकार दिला होता. त्यानंतर तोडपाणीचा व्यवहार दीड लाखांत केला गेला.

रिवार्डच्या निधीत वाढ
चांगले काम करून जास्तीत-जास्त रिवॉर्ड (बक्षीस) मिळवण्यात अर्थ आहे. पोलिसांच्या चांगल्या कामगिरीनंतर दिल्या जाणाऱ्या रिवॉर्डच्या रकमेत तीन लाखांवरून आठ लाखांपर्यंत वाढ करण्यात आला आहे. पुढील महिन्यात वीस लाख रुपये बक्षिसांवर खर्च होणार असल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली.