मॅमोग्राफीच्या इमेजवरून समजणार कर्करोग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

संशोधनातून सॉफ्टवेअर विकसित - बायोप्सीशिवाय होणार कॅन्सरचे वर्गीकरण

औरंगाबाद - स्तन कर्करोगाच्या गाठींचे निदान करण्यासाठी बायोप्सीच्या माहागड्या चाचण्या कराव्या लागतात. तो खर्च वाचावा आणि कमी खर्चात लवकर निदान व्हावे म्हणून बायोप्सी न करता मॅमोग्राफीच्या इमेजवरून ट्युमरचे वर्गीकरण करणाऱ्या सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात शहरातील डॉ. अपर्णा नरेंद्र भाले यांना यश आले आहे. या विषयात संगणकीय विज्ञान शाखेतून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना शुक्रवारी (ता. एक) पीएच.डी. प्रदान केली. 

स्तनाच्या गाठींचे वर्गीकरण करणारे वैद्यकीय क्षेत्रातील हे पहिले सॉफ्टवेअर ठरले आहे. या सॉफ्टवेअरच्या पेटंटसाठी सध्या त्यांचे प्रयत्न सुरू असून, येत्या आठ महिन्यांत हे सॉफ्टवेअर डॉक्‍टरांना वापरासाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती डॉ. भाले यांनी ‘सकाळ’ला दिली. या संशोधनासाठी त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर तेरा शोधनिबंध सादर केले. त्यांच्या संशोधनाला या परिषदांमध्ये मान्यता देण्यात आल्याने त्यांचे शोधनिबंध विविध जर्नल्समधून प्रसिद्ध झालेत. 

स्तनामध्ये आढळणाऱ्या गाठी दोन प्रकारच्या असतात. कर्करोग आणि कर्करोग नसणाऱ्या गाठींची ओळख करण्यासाठी बायोप्सी करावी लागते होती. त्यानंतरच निदान आतापर्यंत होत होते. या सॉफ्टवेअरमुळे मॅमोग्राफीच्या इमेज आणि पेशंट हिस्ट्रीवरून ॲटोमॅटिक या गाठींचे वर्गीकरण करणे शक्‍य झाले आहे. 

सध्या या सॉफ्टवेअरचे क्‍लीनिकल ट्रायल डॉ. उन्मेष टाकळकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. ते या संशोधनाबद्दल समाधानी असल्याचे भाले यांनी सांगितले. त्यांनी ‘ॲनालिसिस ॲण्ड ॲटोमॅटिक क्‍लासिफिकेशन ऑफ बिनाइन लिजन्स इन मॅमोग्राफिक इमेजेस’ यावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक डॉ. मनीष जोशी आहेत. लंडन येथे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ‘डब्ल्यू एस-चार’ या परिषदेत त्यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाला तांत्रिक आणि वैद्यकीय क्षेत्राचे रेकग्निशन मिळाल्याचेही भाले त्यांनी सांगितले. भाले या सरस्वती भुवनच्या विद्यार्थिनी आहेत.  

बिनाइन ब्रेस्ट ट्युमरचे मॅमोग्राफिक इमेजवरून ॲटोमॅटिक क्‍लासिफिकेशन या सॉफवेअरमुळे शक्‍य होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील वापराची माहिती पेटंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर देता येईल. स्तनाच्या कर्करोगाची प्राथमिक पातळीवर ओळख पटविणे शक्‍य करणारे हे पहिले सॉफ्टवेर आहे. आठ महिन्यांत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वापरात येणे अपेक्षित आहे. 
- डॉ. अपर्णा भाले, सहायक प्राध्यापक, कावेरी कॉलेज, पुणे