घाटीत दोन दिवसांपासून सीटी स्कॅन मशीन बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) ६४ स्लाइस सीटी स्कॅन मशीन शुक्रवारपासून (ता. आठ) तांत्रिक कारणांमुळे अचानक बंद पडले. त्यामुळे रुग्णांना बाहेरून तपासण्या कराव्या लागत आहेत. दरम्यान, कंत्राटदाराची थकबाकी वर्षभरापासून थकल्याने त्याने दुरुस्तीस असहमती दर्शविली आहे. 

घाटीत दिवसभरात शंभरहून अधिक सीटी स्कॅन करण्यात येतात. त्यासाठी सहा स्लाइस आणि ६४ स्लाइस सीटी स्कॅन ही अद्ययावत मशीन बसविण्यात आली आहेत. ६४ स्लाइस यंत्रावर दररोज २० रुग्णांची तपासणी करण्यात येते; परंतु शुक्रवारी तीन ते चार रुग्णांची तपासणी केल्यानंतर हे मशीन अचानक बंद पडले. 

दरम्यान, शनिवारी (ता. नऊ) मशीन दुरुस्त करण्यात घाटी प्रशासनाला यश आले नाही; कारण कॉम्प्रेन्सिव्ह मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्‍टचे (सीएमसी) पंचवीस लाख रुपयांचे देणे एक वर्षांपासून घाटी प्रशासनाने दिलेले नाही. पैसे देण्यासाठी घाटीत फंडच नसल्याचे सूत्रांनी सांगितले.