कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ

कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ

औरंगाबाद - हमी दरापेक्षा जास्तीचे दर मिळत असल्याने पणन विभागाच्या "हमी दराने कापूस खरेदी'कडे शेतकऱ्यांनी पाठच फिरविली आहे. मराठवाडा आणि खानदेशात कापसाच्या हमी दराने खरेदी करण्यासाठी पणन व सीसीआयने जवळपास 59 केंद्रे सुरू केली होती. सुरवातीला या केंद्रांपैकी केवळ सीसीआयच्या मोजक्‍या खरेदी केंद्रांवर वाणगीदाखल कापूस खरेदी झाला होता. मराठवाड्यातील हिंगोलीतील केंद्रावर झालेली 58 क्‍विंटलची खरेदी वगळता पणनच्या हमी दराने कापूस खरेदी केंद्राकडे उत्पादकांनी पाठच फिरविल्याचे चित्र होते. ते चित्र आजही कायम आहे. मराठवाड्यात जवळपास साडेपंधरा लाख हेक्‍टरवर कपाशीचे क्षेत्र आहे. यंदा राज्यात सर्वदूरच कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भावर झाल्याने उत्पादनात मोठी घट येण्याचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com