पैशाच्या पावसाच्या आमिषाने पुणेकर महिलेची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - पुरोगामी चळवळीचे केंद्र असलेल्या पुण्यात एका महिलेची अंधश्रद्धेतून तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक झाली. पैशांचा पाऊस पाडून रक्कम दुप्पट करून देण्याच्या नावाखाली गंडवणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील दोन भोंदूबाबांना औरंगाबाद पोलिसांनी बुधवारी (ता. 25) अटक केली.

शेख अकील शेख रफिक (48, रा. साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा) व शेख अजहर शेख अफसर (23, रा. दरेगाव, ता. सिंदखेडराजा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता गजानन लोखंडे (35, मूळ रा. बुलडाणा) या मनीषा आदेश गुजकर (36, रा. मोर्शी, पुणे) यांच्याकडे घरकाम करतात. त्या बुलडाण्यावरून पुण्याला जाताना ट्रॅव्हल्सचालकाशी त्यांची ओळख झाली. त्या वेळी चालकाने तिला पैशांचा पाऊस पाडून पैसे दुप्पट करून देण्याऱ्या व्यक्तीबाबत माहिती दिली होती.