सायबर विश्‍वात फसव्यांचे मायावी जाळे!

सायबर विश्‍वात फसव्यांचे मायावी जाळे!

औरंगाबाद - तुम्ही कुशल सायबर साक्षर आहात. आत्मविश्‍वासाने सोशल मीडिया हाताळता आणि नेट बॅंकिंग व्यवहारही करता; पण सावधान! इंटरनेट वापरकर्त्यांचीच जास्त फसवणूक झाली आहे. ऑनलाइन फसवणूक झालेल्यांत अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील यूजर्सच जास्त आहेत. अपुरे ज्ञानही तुमच्या फसवणुकीचे कारण बनू शकते. त्यामुळे सायबर क्राइमचे प्रकार समजून घेऊन खबरदारी बाळगायला हवी. यातून बहुदा तुमची फसवणूक टळू शकेल.

अशी ओळखा बनावट वेबसाइट 
बनावट वेबसाइट ओळखण्यासाठी आपण ॲड्रेस बारवर जायला हवे. यावर वल्ड वाईड वेब अर्थात (www) आणि https असा अड्रेस बार असावा. याउलट फेक वेबसाइटमध्ये वर्ल्ड वाईड वेब बहुदा नसतेच आणि http एवढेच असते. बॉटम बारमध्ये पॅडलॉक आयकॉन असावाच, जर नसेल तर संशय घ्यावा. 

फिशिंग 
भामटे आपल्यावर गळ टाकतात, फेक इमेल्स पाठवतात; तसेच बल्कमध्ये इमेल्स पाठविले जातात. हे मेल तुम्हाला नवखे वाटणारे व फसवे असतात. याद्वारे मेलवर फसव्या लिंक पाठवून आमिष दाखवले जाते. बऱ्याचदा मेलवरील माहितीतून तुम्हाला घाबरवले जाते. अशा इमेल्सला प्रतिसाद देऊ नका.

मोबाइल ॲपचे धोके
सध्याचे मोबाइल युग आहे. यावरून आपण बॅंकिंग व्यवहार करतो; तसेच सोशल मीडियाचाही वापर करतो. आपल्याला माहितीही नसेल एवढी असंख्य फेक ॲप असतात. त्यामुळे मोबाइलमध्ये ॲप डाऊनलोड करताना ते प्ले स्टोअरमधूनच डाऊनलोड करायला हवे. फसवे ॲप आपल्या मोबाइलचा डाटा चोरू शकतात. परिणामी, फसवणूक होते.

डमी सिमद्वारे फसवणूक 
रेन्ज असूनही दोन-तीन तास मोबाइल ॲक्‍टीव्ह नसेल; तर संशय घ्या, मोबाइल कंपनीला कळवा. यावेळेत तुमचे सीमकार्ड तुमच्याजवळ असतानाही डमी सिमद्वारे वापर होण्याची शक्‍यता असते.

टेलिकॉलिंग 
फोनकॉल्स करूनही भामटे आपणास आमिष दाखवून फसवू शकतात. लॉटरी, बक्षिसांचे आमिष दाखवून जामतारा (झारखंड) व अन्य ठिकाणांहून फोन कॉल्स करून फसविण्याचे प्रकार घडले आहेत.   

स्कीमिंग
आपले डेबिट कार्ड मशीनद्वारे आपल्या नकळत क्‍लोनिंग करून त्यावरील माहिती चोरी केली जाते. विशेषत: भामटे एटीएम मशीनवरील किपॅडवर डमी किपॅडही चिकटवतात व त्यावर अदृष्य कॅमेरा लावतात. त्यामुळे आपण प्रेस केलेला पासवर्ड त्यांच्यापर्यंत पोचू शकतो. भामटे एटीएम केंद्रात ब्लुटूथचाही माहिती संकलित करण्यासाठी वापर करतात. डमी कार्डही ते तयार करतात.

हे ध्यानात ठेवा...
बॅंकेकडून आलेला पिन क्रमांक डेबिटकार्ड एकत्रित सोबत बाळगू नका.
पासवर्ड अल्फा न्यूमरिक ठेवा.
कॉमन नेम, पेटनेम, मित्र-मैत्रिणी, प्रेयसी-प्रियकर, घरातील मंडळी, गाव-शहरांची नावे; तसेच मोबाइल क्रमांक पासवर्ड म्हणून ठेवू नका.
आपले डेबिट कार्ड सेफ कस्टडीत अर्थात ते कुणाच्या हाती लागूच नये.
ऑनलाइन ट्रान्झॅक्‍शन सार्वजनिक ठिकाणी करू नका. आपल्या डेबिट कार्डची एक्‍स्पायरी, सीव्हीव्ही व अन्य डिजिट इतरांच्या हाती लागू देऊ नका.
स्मिशिंग प्रकारात प्लॅस्टिक कार्ड अपग्रेड करण्याबाबत एसएमएस येतात. त्या एसएमएसला थारा देऊ नका.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com