शहर सुरक्षेची डिजिटल पावले!

शहर सुरक्षेची डिजिटल पावले!

औरंगाबाद - बोकाळलेली गुन्हेगारी, भाऊ, दादांचे वर्चस्व, दरोडे आणि मंगळसूत्र चोरांचा ससेमिरा यावर बहुतांशी अंकुश लावण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. त्यासाठी पारंपरिकतेसोबतच डिजिटल प्रणालींचा उपायोग केला जात आहे. यात चिली ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही, जीपीएस प्रणालीचा महत्त्वाकांक्षी वापर यामुळे सुरक्षा वाढीस लागत असून पोलिसांची पावलेही आधुनिकीकरणाकडे वळत आहेत.

शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार यामुळे गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवंलब महत्त्वाचा आहे. शहर पोलिस दलातर्फे डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाल्याने क्राईमरेटवरही परिणाम जाणवू लागले आहेत. मे ते ऑगस्ट २०१६ व यंदाचा हाच कालावधी यादरम्यान घडलेल्या गुन्ह्यांचा तुलनात्मक आढावा घेतल्यास गुन्हेगारीत घट झाल्याचे दिसून येते. मे ते ऑगस्ट २०१६ दरम्यान पाच दरोडे घडले यंदा यात तीनने घट झाली. गतवर्षी याच तीन महिन्यांत २१ खून झाले. यंदा या कालावधीत ११ खून झाले. अर्थातच दहाने घट झाली असून प्रमाण ४८ टक्के आहे. गेल्यावर्षी तीन महिन्यांत जबरी चोरी व घरफोडीचे प्रत्येकी १२७ गुन्हे नोंद झाले. यंदाच्या कालावधीत ८५ गुन्हे जबरी चोरीचे नोंद झाले असून ६६ टक्के घट झाली. तर यंदाच्या कालावधीत ५० घरफोड्या झाल्या असून तुलनेत ६१ टक्‍क्‍यांनी प्रमाण घटले. 

वाहन चोरी बहुतांशी रोखण्यात पोलिसांना यश आले नाही. पण गेल्यावर्षी याच कालावधीत ३७९ वाहनांची चोरी झाल्याची नोंद आहे. यंदा २०३ गुन्हे नोंद झाले असून यात १७६ ने घट झाली आहे. तसेच गेल्यावर्षी साखळी चोरीच्या १३ घटना घडल्या. यंदा दहा घटना उघड झाल्या.

सकारात्मक धोरणांचा परिणाम
शहराची सुरक्षा वाढीस लागत असून मंगळसूत्र चोरीवर अंकुश बसत आहे. मालमत्ताविषयक गुन्ह्यांमध्येही लक्षणीय घट झाल्याचे दिसते. मात्र, दुचाकी चोरी रोखण्यासाठी पोलिसांना आणखी प्रयत्न करावे लागतील. व्यावसायिक पोलिस धोरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कम्युनिटी पोलिसिंग (विशेष पोलिस अधिकारी उपक्रम) याचा सकारात्मक परिणामही आता जाणवत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उपलब्ध मनुष्यबळाचा सुयोग्य वापर शक्‍य असल्याचे दिसून येते. जीपीएस प्रणालीमुळे चोख गस्त होत आहे. परिणामी गुन्हेगारी घटत आहेत. रेकार्डवरील गुन्हेगारांवर एमपीडीए, हद्दपारी यासारख्या कार्यवाहीमुळे गुन्हे घटत असून मालमत्ताविषयक प्रकरणात धडक कारवाया होत असल्याने हे गुन्हेही घटत आहेत.
- यशस्वी यादव, पोलिस आयुक्त, औरंगाबाद

गेल्या चार महिन्यांत केलेल्या उपाययोजना
सर्व पोलिस वाहनांना जीपीएस यंत्रणा लावण्यात आली. परिणामी गस्त चोख झाली.

स्मार्ट सिटी प्रकल्पातील बंद पडलेले कॅमेरे दुरुस्त करण्यात आले. त्यामुळे गुन्हे उघड होण्यास मोठा हातभार लागत आहे.

महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार अकराशे विशेष पोलिस अधिकाऱ्यांचा पोलिस प्रशासनात समावेश करण्यात आला.

चिली ड्रोन कॅमेऱ्याचा पोलिस दलात समावेश झाला. यातून कायदा व सुव्यस्था राखण्यास मोठी मदत होणार आहे. सुरक्षित गणपती विसर्जनासाठी याच ड्रोनचा उपयोग झाला.

सीसीटीव्ही, जीपीएसमुळे पोलिस दलाला संजीवनी
तीन महिन्यांत झाली गुन्हेगारी घटनांत घट
कम्युनिटी पोलिसिंगचा प्रभावीपणे वापर
मालमत्ताविषयक प्रकरणांत धडक कारवायांचे सत्र सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com