बाजार समितीत आवकीवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

औरंगाबाद - बाजार समितीमधील फळभाजीपाला मार्केटवर संपाचा परिणाम दिसून येत आहे. भाजीपाल्याची 20 टक्‍क्‍यांपर्यंत आवक कमी झाली आहे. त्यामुळे रविवारी (ता. चार) बाजार समितीमध्येच भाजीपाल्याची महागात विक्री झाली.

सुटीचा दिवस असल्याने अनेकजण भाजीपाला खरेदीसाठी बाजार समितीत येतात; मात्र त्यांना यावेळेस महाग भाजीपाला खरेदी करावा लागला. बाजार समितीमध्ये तर काही भाज्यांच्या किमती किरकोळ बाजारासारख्या महाग झाल्या होत्या. शेतकरी संपाचा फटका बाजार समित्यांच्या आवकीवर होताना दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अगोदरच पालेभाज्या महाग असताना संपामुळे त्यात जास्तीची भर पडली आहे. कोबी, मिरची, टोमॅटोचे भावसुद्धा वाढले आहेत.