बिल भरणाऱ्यांनाही बसणार भारनियमनाचा शॉक

बिल भरणाऱ्यांनाही बसणार भारनियमनाचा शॉक

औरंगाबाद - राज्यात विजेचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, महावितरणने राज्यभर तात्पुरते भारनियमन करण्याचा निर्णय घेतला. या भारनियमनामुळे जिल्हाभर सात ते आठ तास भारनियमन करण्यात येत असून त्याचा जनजीवनावर विपरित परिणाम दिसून येत आहे. अचानक उद्‌भवलेल्या या परिस्थितीने विजेअभावी नागरिकांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, शहराच्या अर्ध्याहून अधिक भागात सोमवारी (ता. ११) सकाळी सहापासून भारनियमनास सुरवात झाली आहे.

वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठ्यात अडचणी येत असल्याने, महावितरणने राज्यात तात्पुरते भारनियमन करण्याचा निर्णय घेतला आहे. वीज निर्मिती कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून सुमारे सात हजार मेगावॉट, अदानी पॉवर कंपनीकडून तीन हजार ८५ मेगावॉट वीज मिळणे अपेक्षित आहे. मात्र कोळशाची उपलब्धता व पुरवठ्यात आलेल्या अडचणींमुळे महानिर्मिती कंपनीकडून केवळ साडेचार हजार मेगावॉट व अदानी कंपनीकडून दोन हजार मेगावॉट इतकीच वीज मिळत आहे. त्याचप्रमाणे एम्को व सिपत या कंपन्यांकडूनही केवळ शंभर व साडेपाचशे मेगावॉट वीज मिळत आहे. यामुळे महावितरणने जिल्हाभरात भारनियमन सुरू केले आहे. कमीत कमी वसूल व अधिक वीज गळती असलेल्या भागात आठ ते दहा तासांपर्यंत लोडशेडिंग केले.

विजेची कमतरता असल्याने तात्पुरत्या स्वरूपात हे लोडशेडिंग करण्यात येत असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू झालेले आहे. महावितरणने निविदा काढून खुल्या बाजारातून ३९५ मेगावॉट वीज खरेदी केली आहे. येत्या दोन दिवसांत हा वीजपुरवठा सुरळीत होईल, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

भारनियमन सुरू करण्यात आलेला भाग 
सिटी चौक वाहिनीवरील - भडकलगेट, टाऊनहॉल, जयभीमनगर, नूरकॉलनी, नेहरू भवन, जामा मस्जिद. 

वसंत भवन वाहिनीवरील - संतोषीनगर, नारळीबाग, जुनाबाजार, बारुदगरनाला, धनमंडी, दगडगल्ली, वसंत भवन परिसर. 

मकबरा - विद्युत कॉलनी, आरेफ कॉलनी, गौतमनगर, प्रगती कॉलनी, मकाईगेट, आसेफिया कॉलनी, महेबूब कॉलनी, पहाडसिंगपुरा, जलाल कॉलनी आणि गुलाबवाडी. 

पानचक्की - लालमंडी, बेगमपुरा, कुतूबपुरा, जयसिंगपुरा, बिमसारगल्ली. 

कोहिनूर कॉलनी - घाटी रुग्णालय परिसर, जिल्हा परिषद निवासस्थान, जुबली पार्क, कोहिनूर कॉलनी. 

आयटीआय - मिलिंदनगर, कबीरनगर, वेदांतनगर, बन्सीलालनगर, रेल्वेस्टेशन, सब्जीमंडी. 

राहुलनगर - सिल्कमिल कॉलनी, साजादनगर, राहुलनगर, जालाननगर, शाह दर्गा, महानुभाव आश्रम, धनगरवाडा. 

होलिक्रॉस परिसर - होलिक्रॉस शाळा परिसर, पोस्ट ऑफिस, पद्मपुरा भाग, बन्सीलालनगर, बनेवाडी, कोकणवाडी, फॉरेन्सिक लॅब परिसर, जिल्हा न्यायालय व परिसर, कर्णपुरा, पंचवटी परिसर,  रेल्वेस्टेशन परिसर. 

छावणी - नेहरू चौक, ख्रिस्तनगर, छावणी परिसर, होलिक्रॉस शाळा व परिसर, नंदनवन कॉलनी. 

मिलिंद कॉलनी वाहिनी - मिलिंद कॉलेज परिसर, भीमनगर, छावणी पोलिस ठाणे, भुजबळनगर. 

आयईआरबी वाहिनी - आयईआरबी, सातारा तांडा, श्रेयस इंजिनिअरिंग व परिसर. 

नाथव्हॅली स्कूल वाहिनी - नाथपूरम, मोदीनगर, इटखेडा, आनंदविहार सारा हार्मोनी, माँ बाप दर्गा परिसर, ब्रेस्ट प्राईज मॉल परिसर, सुधाकरनगर, शिल्पनगर, ऑरेंजसिटी, धन्वंतरी, चौधरी, ठक्कर, प्राईजेस. 

पेठेनगर परिसर - भाऊसिंगपुरा व परिसर, ग्लोरिया कॉलनी, पेठेनगर, भीमनगर. 

दर्गा फिडर - शहा कॉलनी, कासंबरी दर्गा व परिसर. यासह शंभरावर कॉलनी व वसाहतींमध्ये आठ ते दहा तास लोडशेडिंग करण्यात आल्याने नागरिक त्रस्त.

अर्ध्या शहरात आठ ते दहा तास लोडशेडिंग 

जवळपास दोनशे वसाहतीत राहणार भारनियमन

कमी वसुली, अधिक गळती असलेल्या भागांना फटका

व्यवहार ठप्प,  जनजीवन विस्कळित 

राज्यात विजेचा प्रचंड तुडवडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com