अतिक्रमण हटविल्याशिवाय कार्यालयात परत येऊ नका!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

औरंगाबाद - शहरात अतिक्रमणांचा विळखा वाढत असताना प्रशासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी मात्र कार्यालयात पंख्यांची हवा खात बसल्याने संतप्त झालेल्या महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी त्यांना रस्त्यावर बोलावून घेत कामाला लावले. अतिक्रमण हटविल्याशिवाय परत येऊ नका, अशी तंबी दिल्यानंतर सायंकाळी साडेसहापर्यंत दिल्ली गेट परिसर व पैठण गेट ते सिटी चौक या रस्त्यावर कारवाई करून अतिक्रमणे हटविण्यात आली. 

शहरातील अतिक्रमणांबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत. बुधवारी शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी शिष्टमंडळासह महापौरांची भेट घेऊन अतिक्रमणे हटविली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर संतप्त झालेले नंदकुमार घोडेले व सभागृह नेते विकास जैन हे प्रशासकीय विभागात गेले. या ठिकाणी अधिकारी-कर्मचारी पंख्यांची हवा खात बसले होते. त्यांना टप्पा क्रमांक दोनच्या इमारतीच्या मोकळ्या जागेत बोलाविण्यात आले. यावेळी एकही कर्मचारी-अधिकारी आता कार्यालयात थांबणार नाही, सर्वांनी मोहिमेवर जाऊन जोपर्यंत अतिक्रमणे हटत नाहीत तोपर्यंत परत फिरू नये, अशी तंबी त्यांना देण्यात आली व १५ पोलिस, १३ इमारत निरीक्षक, दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांसह ताफा महापालिका कार्यालयाबाहेर पडला. दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहापर्यंत अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यात दिल्ली गेट ते रोजेबाग रस्त्यावरील सहा गाड्या भरून जुने फर्निचर तसेच पैठण गेट ते सिटी चौक रस्त्यावरील १२ हातगाड्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी सी. एम. अभंग यांनी दिली.

Web Title: aurangabad marathwada news encroachment municipal office