१६२ रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले समाधानाचे हास्य

औरंगाबाद - प्लास्टिक सर्जरी झालेल्या रुग्णाची विचारपूस करताना डॉ. राज लाला आणि सहकारी.
औरंगाबाद - प्लास्टिक सर्जरी झालेल्या रुग्णाची विचारपूस करताना डॉ. राज लाला आणि सहकारी.

औरंगाबाद - जन्मतःच दुभंगलेले ओठ, अपघातामुळे चेहऱ्यावर पडलेले डाग, भाजल्याच्या खुणा, इतर वैगुण्ये जाऊन कित्येक आबालवृद्ध रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुललेले दिसून आले. लायन्स क्‍लब औरंगाबाद-चिकलठाणातर्फे आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात शुक्रवारपर्यंत (ता. १५) १६२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

लायन्स क्‍लब ऑफ औरंगाबाद-चिकलठाणाच्या वतीने आणि महात्मा गांधी मेमोरियल रिसर्च सेंटर तसेच औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ४२व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात दुसऱ्या दिवशी विविध प्रकारच्या ८८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात पडलेल्या पापणीच्या पाच, दुभंगलेल्या ओठांच्या चार, चेहऱ्यावरील व्रणांच्या २५, नाकावरील व्यंगांवर तीन, रक्तवाहिनीतील गाठींच्या पाच आणि इतर २५ शस्त्रक्रियांचा समावेश आहे. अमेरिकेहून आलेले तज्ज्ञ डॉ. राज लाला आणि डॉ. विजय मोराडिया यांनी डॉ. अमित बसन्नवार, डॉ. ललिता लाला, डॉ. मालती दमाणी, डॉ. कल्याणी बसन्नवार यांच्यासह एमजीएमच्या शस्त्रक्रियागारामध्ये या शस्त्रक्रिया केल्या.

शिबिरात औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर अग्रवाल, सतीश ठोळे आणि मनोहर कोरे यांनी औषध पुरवठ्याचे नियोजन केले. पहिल्या दोन दिवसांत नाशिक, कल्याण, अलिबाग, दमण, नांदेड, लातूर, अकोला, उस्मानाबाद, नंदुरबार, धुळे, जळगावसह सिल्लोड, वैजापूर, गंगापूर, कन्नड येथील रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या. 

एमजीएमच्या भूलतज्ज्ञ डॉ. एस. जे. कुलकर्णी, डॉ. आर. पी. कुलकर्णी, डॉ. नागराजू गेडाम, डॉ. सुनील, डॉ. अपूर्वा देशमुख, डॉ. विदिशा आदींनी यात सहभाग घेतला. एमजीएमचे एम. टी. काझी यांनी समन्वयाचे काम केले. यशस्वितेकरिता राजेंद्र लोहिया, प्रकल्पप्रमुख डॉ. मनोहर अग्रवाल, सचिव रवींद्र करवंदे यांच्यासह भूषण जोशी, मोहन पटेल, विनोद चौधरी, प्रकाश गोठी, सुरेश बापना, राजकुमार टिबडीवाला, प्रकाश राठी, मनोहर पटेल, जयकुमार थानवी, दीपक अग्रवाल आदींसह क्‍लबचे सदस्य प्रयत्न करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com