मापातील घोळामुळे इंधन खरेदी मंदावली!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

पंपांवर रांगाच रांगा, सायंकाळनंतर वाढली गर्दी

औरंगाबाद - शहरातील पेट्रोल पंपांवर बुधवारी (ता.२८) दुपारनंतर अचानक गर्दी झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. इलेक्‍ट्रॉनिक चीपच्या माध्यमातून इंधन चोरीच्या प्रकारानंतर पोलिस आणि इंधन कंपन्यांनी शहरात धाडसत्र सुरू केले. तीन पंपांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळेच शहरातील पंप कोरडेठाक पाडले जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. 

ठाणे शहरात इलेक्‍ट्रॉनिक चीपच्या माध्यमातून इंधन विक्रीच्या मापात पाप करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली हाती. पोलिसांनी केलेल्या तपासात अशाप्रकारच्या चीप औरंगाबाद शहरातही विक्री केल्याची माहिती समोर आली. त्याचा धागा पकडून शहरातही पंपांवर धाडसत्र सुरू करण्यात आले होते. मोजमापात गडबड सापडल्याने शहरातील तीन पंपांवर कारवाई करण्यात आली. यात चुन्नीलाल आणि भवानी आणि गजानन महाराज मंदिर रोडवरील एस्सार कंपनीच्या पंपाचा समावेश होता. कारवाईचा बडगा उगारल्यानंतर लगेच शहरातील पंप कोरडे पडू लागले आणि बुधवारी (ता.२८) नागरिकांच्या रांगाच रांगा शहरातील पंपांवर लागल्या. या कारवाईमुळेच पंप कोरडे पाडले जात आहेत. वितरकांनी इंधन खरेदीसाठीही हात आखडता घेतला असल्याची जोरदार चर्चा शहरातील पंपांवर रंगली होती. 

घटली खरेदी
सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलत आहेत. त्यात प्रत्येकदिवशी घसरण होत आहे. दर घसरत असल्याने चढ्या भावाने आणलेला माल तोट्यात विकावा लागत असल्याने सध्या खरेदी कमीच असल्याची माहिती पेट्रोल- डिझेल वितरक संघटनेचे सचिव अखिल अब्बास यांनी दिली. दरम्यान ईदीचा काळ असल्याने कामगार मुले सुटीवर आहेत. त्यामुळे पंपांवरील काही नोझल बंद असल्याने गर्दी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.