बंदिस्त घरात मुलीची कापली वेणी!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - उत्तर प्रदेशात वेणी कापण्याच्या प्रकाराने खळबळ सुरू असतानाच आता औरंगाबादेत एका दहावीतील १४ वर्षीय मुलीची वेणी कापल्याची विकृत घटना जहांगीर कॉलनीत सोमवारी (ता. २१) रात्री अकराच्या सुमारास घडली. हा सारा प्रकार बंदिस्त घरात झाला. रात्री कुटुंबीय जागी असूनही झोपलेल्या मुलीची वेणी कापली गेल्याने तर्कविर्तक लावण्यात येत आहेत.

औरंगाबाद - उत्तर प्रदेशात वेणी कापण्याच्या प्रकाराने खळबळ सुरू असतानाच आता औरंगाबादेत एका दहावीतील १४ वर्षीय मुलीची वेणी कापल्याची विकृत घटना जहांगीर कॉलनीत सोमवारी (ता. २१) रात्री अकराच्या सुमारास घडली. हा सारा प्रकार बंदिस्त घरात झाला. रात्री कुटुंबीय जागी असूनही झोपलेल्या मुलीची वेणी कापली गेल्याने तर्कविर्तक लावण्यात येत आहेत.

पोलिसांनी माहिती दिली, जहांगीर कॉलनीत दहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीसोबत वेणी कापण्याचा प्रकार घडला. घटना उघड झाली, त्यापूर्वी कॉलनीत अनेकजण जागी होते. त्या वेळी घरातील हॉलमध्ये मुलीचा चुलत भाऊ टीव्ही पाहत होता. केस कापण्यात आलेली मुलगी दहा बाय दहाच्या खोलीत  झोपली होती. त्यादरम्यान मुलीचे वडील कामाहून घरी परतले. त्यानंतर ते दुसऱ्या खोलीत जाऊन पत्नीशी चर्चा करीत होते. यानंतर रात्री अकराच्या सुमारास मुलीची वेणी कापल्याची बाब मुलीच्या आई-वडिलांच्या निदर्शनास आली. उत्तर प्रदेशातही चोटी गॅंगकडून तरुणी, महिलांच्या वेणी कापल्याचे प्रकार घडल्याने मुलीसोबतही असाच प्रकार पाहून आई-वडील हादरून गेले. ही बाब परिसरात कानोकान पसरली. दरम्यान, वेदांतनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबीयांची विचारपूस व चौकशी केली. दरम्यान, खबरदारी म्हणून पोलिसांनी मुलीला घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. घरात सर्व जागी असतानाही वेणी कापल्याच्या प्रकार घरातूनच घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. 

बाहेरून येणे अशक्‍यच..
जहांगीर कॉलनीत सुमारे २५ ते ३० व्यक्ती जागी होत्या; तर याच कुटुंबातील मुलीच्या भावाचे दुकान रात्री उघडेच होते. त्यातच मुलीचे घर बंद होते. मुलीचा एक चुलतभाऊ हॉलमध्ये टीव्ही पाहत होता. दुसऱ्या खोलीत मुलीचे आई-वडील चर्चा करीत होते. अशावेळी बाहेरून घरात कोणी येणे शक्‍यच नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे.

खोडसरपणा, वैमनस्यातून प्रकार?...
अंर्तगत कलह अथवा वैमनस्यातून मुलीची वेणी कापली असावी. तसेच मुद्दामहून खोडसळपणा म्हणूनही असा विक्षिप्त प्रकार झाला असावा. विशेषत: अंधश्रद्धेतूनही मुलीची वेणी कापली गेली असावी असा कयास लावला जात आहे.  

आठवड्यातील तिसरी घटना 
सातारा परिसरातही एका महिलेची वेणी कापल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघड झाला. महिलेने सांगितले, सकाळी झोपीतून उठल्यानंतर केस कापलेले दिसले; पण याबाबत आपण कोणतीही तक्रार दिलेली नाही. या शिवाय छावणी बाजारातही पाच दिवासांपूर्वी एका महिलेची वेणी कापली गेली होती. पर्स चोरी करताना चोरांकडून ती कापली गेली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

औरंगाबादच्या जहांगीर कॉलनीतील प्रकार
आतून कडी असताना घरातच घडला प्रकार 
तर्कविर्तकाला उधाण