शिवछत्रपतींच्या दरबारातही यंदा ‘जीएसटी’ची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

‘संस्थान गणपती’तर्फे साकारला जाणार सजीव देखावा, विविध कार्यक्रमांचे आयोजन 

औरंगाबाद - शहरातील मानाचा म्हणून परिचित असलेल्या संस्थान गणपती ट्रस्टच्या वतीने साकारण्यात येत असलेल्या सजीव देखाव्यात शिवाजी महाराजांचा दरबार साकारण्यात येणार आहे;  मात्र या दरबारात ऐतिहासिक बाबींवर चर्चा न करता सद्यःस्थितीत देशात होणाऱ्या बदलांवर चर्चा करण्यात येणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदासुद्धा विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या मदतीने यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार असल्याची माहिती ट्रस्टतर्फे मंगळवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

सजीव देखाव्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात अग्रेसर असलेल्या शहरातील संस्थान गणपती ट्रस्टच्या वतीने यंदा देशात होणारे बदल सगळ्यांपुढे मांडण्याचे ठरवले आहे. 

गतवर्षी स्त्रियांवरील अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या या मंडळाकडून यंदा जीएसटी, नोटबंदी आणि अन्य बदलांवर नाट्य दाखविले जाणार आहे. विशेष म्हणजे शिवाजी महाराज आज देशातील या बदलांचा आढावा घेणार असल्याचा हा देखावा साकारण्यात येत आहे. याशिवाय प्रतिवर्षीप्रमाणे शुक्रवारी (ता. २५) मूर्तींची स्थापना मान्यवरांच्या उपस्थितीत झाल्यानंतर वार्षिक अहवाल विमोचन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दरदिवशी सकाळी साडेसात ते साडेआठ दरम्यान अथर्वशीर्ष पठण करण्यात येणार आहे. मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, पर्यावरणाच्या बचावाचे फलकही लावण्यात येणार आहेत. रोज दुपारी अडीच ते चार दरम्यान भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून एक सप्टेंबरला सायंकाळी सात ते आठ दरम्यान रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय गरजूंना गणवेश वाटप, आर्थिक मदत आणि गोशाळांना चारही देण्यात येणार आहे. 

२५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात येणार असून, पारंपरिक पद्धतीने रथ खेचून अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. यात चाळीसगावचा बॅंड आणि ब्रह्मगर्जनाचे ७१ जणांचे ढोलपथक सहभागी होणार असल्याची माहिती या वेळी परिषदेत देण्यात आली.   पत्रकार परिषदेला ट्रस्टचे प्रफ्फुल मालानी, रमेश घोडेले, राजाबाजार मित्रमंडळाचे सुनील चौधरी, चिराग गादिया यांची उपस्थिती होती.

मराठवाडा

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील कुत्री पकडण्याचा विषय थेट दिल्लीपर्यंत गेला असून, केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी याप्रकरणी...

01.39 AM

समाजवादी पक्ष महापालिकेच्या ५० जागा लढविणार नांदेडः सद्या देशाची अवस्था वाईट असून, धर्माच्या नावाने सत्तेत आलेले भाजप गाय व...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017