भारतीय चित्रपटसृष्टीत मराठी सिनेमा अग्रस्थानी

भारतीय चित्रपटसृष्टीत मराठी सिनेमा अग्रस्थानी

औरंगाबाद - ‘‘गेल्या दहा वर्षांत मराठी सिनेमामध्ये मोठा बदल झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कारासाठी अग्रस्थानी असलेल्या मल्याळम आणि तामिळी सिनेमाची जागा आता मराठी सिनेमा घेत आहे. यामुळे भारतीय सिनेमात मराठी सिनेमा पहिल्या स्थानावर आला आहे,’’ असे मत दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते तथा पद्मविभूषण अदूर गोपालकृष्णन यांनी व्यक्त केले. 

प्रोझोन मॉलच्या आयनॉक्‍स थिएटरमध्ये पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला. यात श्री. गोपालकृष्णन बोलत होते. या वेळी महोत्सवाचे संचालक अशोक राणे, अभिनेता उपेंद्र लिमये, परीक्षक विकास देसाई, ॲनी कॅटलीग, अजित दळवी, सुजाता कानगो, सचिन मुळे, नंदकिशोर कागलीवाल, सतीश कागलीवाल, दासू वैद्य, रेखा शेळके, आयनॉक्‍सचे सिद्धार्थ मनोहर, विजय कान्हेकर, दत्ता बाळसराफ, मोहंमद अर्शद, शिव कदम, नीलेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. गोपालकृष्ण म्हणाले, ‘‘माझ्यावर व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या गाण्याचा पगडा होता. साठच्या दशकात मी पुण्याच्या एफटीआयला प्रवेश घेतला. या ठिकाणी मराठी मुले दुर्मिळ होती. मराठी भाषा, नाटक, संगीत यांची महाराष्ट्रात एक मोठी परंपरा आहे. गेल्या दहा वर्षांत मराठी सिनेमांना चांगला काळ आला आहे.’’ जयप्रद देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

शस्त्रक्रियेमुळे पालेकर अनुपस्थित
महोत्सव समितीतर्फे देण्यात येणारा पहिला जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते अमोल पालेकर यांना जाहीर झाला; मात्र त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली असल्यामुळे ते हा पुरस्कार स्वीकारण्यास येऊ शकले नाहीत. त्यामुळे महोत्सव समितीतर्फे पुण्याला त्यांच्या घरी जाऊन पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

निकाल पुढीलप्रमाणे
  सर्वोकृष्ट सिनेमा - क्षितिज  
  उत्कृष्ट ध्वनी संयोजन - पुप्पा 
  बेस्ट एडिटिंग - रुख  
  उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - साउंड ऑफ सायलेन्स 
  बेस्ट सिनेमॅटोग्राफर - रुख  
  बेस्ट स्क्रीन प्ले - क्षितिज 
  बेस्ट ॲक्‍ट्रेस - छाया कदम (रेडू)
  बेस्ट ॲक्‍टर्स - राहुल बॅनर्जी (पुप्पा)
  उत्कृष्ट दिग्दर्शक - इंद्रसिस आचार्य 
  स्पेशल मनेशन्स ज्युरी ॲवॉर्ड - वैष्णवी तांगडे (क्षितिज)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com