टपाल कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - टपाल खात्याने राज्यातील 395 कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या अचानक रद्द केल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. या सर्व कर्मचाऱ्यांना आठ आठवड्यांत नियुक्त करण्याचा आदेश न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. ए. एम. ढवळे यांनी दिला आहे.

टपाल विभागाने मार्च 2015 मध्ये "पोस्टमन' आणि "मेलगार्ड' या पदांसाठी परीक्षा घेतली होती. यात अंदाजे सहा हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी एक हजार सातशे उमेदवारांची निवड यादी प्रकाशित करण्यात आली होती. त्यातील 395 उमेदवारांना प्रशिक्षण देऊन नियुक्‍त्या दिल्या, अन्य उमेदवार प्रतीक्षा यादीवर होते. असे असतानाच 25 नोव्हेंबर 2016 रोजी मुंबई मुख्य पोस्ट मास्टर जनरल यांनी अचानक आदेश काढून संपूर्ण निवड प्रक्रिया रद्द केल्याचे टपाल खात्याच्या संकेतस्थळावर जाहीर केले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून तडकाफडकी काढून टाकले व निवड यादीही रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्याविरोधात निवड यादीतील 145 उमेदवारांनी खंडपीठात चार याचिका दाखल केल्या होत्या.