पेपर उत्पादकांची औरंगाबादेत परिषद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - इंडियन पल्प ऍण्ड पेपर टेक्‍निकल असोसिएशन (इप्टा) तर्फे देशभरातील पेपर उद्योगातील प्रतिनिधींची विभागीय परिषद व चर्चासत्र औरंगाबादमध्ये होणार आहे. शनिवार (ता. पाच) व रविवार (ता. सहा) असे दोन दिवस ही परिषद होणार असल्याची माहिती "इप्टा'चे अध्यक्ष पवन अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

"इप्टा' ही गेल्या 53 वर्षांपासून काम करणारी देशव्यापी संस्था आहे. संस्थेतर्फे प्रत्येक वर्षांत तीन परिषदा घेण्यात येतात. देशभरात तयार होणाऱ्या कागद उत्पादनात चाळीस टक्के वाटा महाराष्ट्र आणि गुजरातचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पेपर उद्योगाला अधिकाधिक चालना देण्याच्या उद्देशाने ही परिषद होणार आहे.