पेटंटसाठी पदवी नव्हे, इनोव्हेशन हवे!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

औरंगाबाद - एखादा आविष्कार आपल्या नावे आहे, हे सिद्ध करण्यासाठी लागणारे पेटंट मिळविण्यासाठी कोणत्याही पदवीची नाही, तर इनोव्हेशनची गरज असल्याचे मत अंकिता नगरकर यांनी व्यक्त केले. सात पेटंट आपल्या नावे असलेल्या नगरकर यांनी ‘यिन’ सदस्यांसोबत शनिवारी (ता. ३१) औरंगाबाद कार्यालयात संवाद साधला.

यावेळी त्यांचे संपादक संजय वरकड यांनी स्वागत केले. डॉ. ए. जी. नगरकर, एेश्‍वर्या शिंदे, नगरविकास मंत्री सानिका जगदाळे, जिल्हाध्यक्ष धीरज पवार आणि ‘यिन’ सदस्यांची उपस्थिती होती. अंकिता यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची दखल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली आहे. त्यांनी ५४ पुरस्कार पटकाविले असून, पेट्रोलपंपांबाबतच्या संशोधनाची नोंद पंतप्रधान कार्यालयानेदेखील घेतली आहे. पारंपरिक विचारांच्या चौकटी मोडून नावीन्यतेचा ध्यास घेण्याचा संदेश त्यांनी दिला. संशोधनांचे पेटंट मिळविण्यासाठी पदवी नाही; तर नावीन्यता लागते, नावीन्य असल्यास पेटंट करणे सोपे होते, असे नगरकर यांनी  सांगितले.

हे त्यांनी एका सोप्या उदाहरणातून स्‍पष्ट केले. त्या म्हणाल्या, स्टॅपलरमधून शेवटची पिन बाहेर आल्याशिवाय पिन्स संपल्याचे कळत नाही. पण, त्या संपत आल्या आहेत हे कळण्यासाठी एक सोपा मार्ग आहे. या पिनांमध्ये असलेल्या शेवटच्या काही पिनांना रंग द्यायचा. म्हणजे त्या कागदाला लागल्या की आपल्या स्टॅपलरमधील पिन्स संपत आल्या आहेत, हे समजायचे.

कुटुंबीयांचे पाठबळ महत्त्वाचे
संशोधनाचा वारसा अंकिता यांना घरातूनच मिळाला. त्यांच्या वडिलांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम केलेले आहे. ‘वडिलांचे मला नेहमीच सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले आहे. कोणतेही चांगले काम कुटुंबीयांच्या पाठबळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

Web Title: aurangabad marathwada news patent post innnovation