राजर्षी शाहू महाराजांना ठिकठिकाणी अभिवादन

राजर्षी शाहू महाराजांना ठिकठिकाणी अभिवादन

औरंगाबाद - आरक्षण लागू करून सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे उघडे करीत शिक्षणाची सक्ती करणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनानिमित्त सोमवारी (ता. २६) शहरात विविध पक्ष, संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. शहरभर व्याख्याने, चर्चासत्रे, रक्तदान शिबिरे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मिलकॉर्नर येथील शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिवसभर गर्दी झाली होती.

महापौरांनी केले अभिवादन
महापालिकेतर्फे महापौर भगवान घडामोडे यांनी मिलकॉर्नर येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी वॉर्डाच्या नगरसेविका कीर्ती शिंदे, वॉर्ड एकचे अधिकारी भालचंद्र पैठणे, वॉर्डाधिकारी श्री. एस. आर. जरारे उपस्थित होते. 

पीपल्स रिपब्लिकन पार्टी
पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे मिल कॉर्नर येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला जिल्हाध्यक्ष सागर कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष मुकेश मकासरे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रिना वाकळे, प्रकाश जाधव, शेषराव सातपुते, राहुल पडघन, अशोक कनकुटे, प्रवीण होर्शिळ, आकाश चौथमल, अमोल घागरे, सचिन बोर्डे, अमोल वानखेडे, मंगेश साखरे उपस्थित होते.

रिपब्लिकन सेना
सेनेचे जिल्हाध्यक्ष के. व्ही. मोरे यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रा. विजयकुमार घोरपडे, प्रशांत म्हस्के, प्रा. सिद्धोधन मोरे, मिलिंद बनसोडे, लक्ष्मीकांत पाटील, अमर शेजवळ, दया उजागरे, विक्रम जावळे, अजय बनसोडे, बाला बनसोडे, रमेश सावंत, यमाजी सावंत यांची उपस्थिती होती.

भारत माता क्रीडा मंडळ
मंडळाचे अध्यक्ष बळवंत पाटील यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच एक जुलैला वृक्षारोपण करण्यात येणार असून, उपस्थितीचे आवाहन करण्यात आले. या वेळी मारोती फुलारी, सुनील चौधरी, जयेंद्र दळवी, बंटी मानकापे, भगवान वळसे, सुनील लोखंडे, अभिजित फुलारी यांची उपस्थिती होती.

भाजप अनुसूचित मोर्चा 
भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे शाहू महाराज यांच्या मिलकॉर्नर येथील पूर्णाकृती पुतळ्यास शहराध्यक्ष उत्तम अंभोरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत हिवराळे, बबन नरवडे, बबन दाभाडे, प्रसाद कोरके, अमोल अंभोरे, प्रशांत साठे, किशोर जोगदंडे, संदीप गंगावणे, मिलिंद जावळे यांची उपस्थिती होती.

धम्मरत्न मित्रमंडळ
धम्मरत्न मित्रमंडळातर्फे टीव्ही सेंटर चौक येथे शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी दौलत खरात, राजू खरे, लक्ष्मण मगरे, मिलिंद दाभाडे, प्रकाश सोनवणे, एकनाथ पाखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी बी. डी. सूर्यवंशी, संतोष सोनवणे, सुनील खरात, यशवंत दाभाडे, उद्योजक रमेश वानखेडे, मगन खंडागळे, उत्तमराव तांबे यांनी पुढाकार घेतला. 

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकनतर्फे शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मिलकॉर्नर येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी देवानंद खंदारे, प्रल्हाद सदावर्ते, विजय दिवेकर, राजेंद्र जगताप, नसीम बानो पटेल, सोमीनाथ थोरात, सतीश हिवराळे, विकास ढवळे, दीपक साळवे, मंदाकिनी गायकवाड यांची उपस्थिती होती.

भारतीय जनसंघर्ष सेना
सेनेतर्फे मिलकॉर्नर येथील शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सुशील भिसे, सुनील बोराडे, रवी गवई, सखाराम गायकवाड, रवींद्र वैष्णव, संतोष गिरी, अतुल मगरे, दादाराव भालेराव, विजय हिवळे, शांतिलाल एडके यांची उपस्थिती होती.

फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रबोधन परिषद
फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेतर्फे शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. व्ही. डी. देशपांडे सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष सुनील गोसावी यांची उपस्थिती होती. यावेळी भीमराव सोनवणे, संभाजी साबळे, ओमपाल चावरिया, कबीरानंद राजहंस, राणूजी जाधव, एस. एस. जमधडे, हिरालाल मगरे, सुंदरलाल साळवे, संजय चिकसे यांची उपस्थिती होती

राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ
महासंघातर्फे मिलकॉर्नर येथील शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. देवानंद वानखेडे यांनी शाहू महाराज यांच्या जीवनकार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी अनिल पांडे, सुबोध सावळे, विलास जगताप, किरण मापारी, प्रकाश कांबळे, रमेश थोरात, बी. जी. गायकवाड, मधुकर मोकळे, उल्हास हिवर्डे, राजू अहिरे, रामकृष्ण अवचार, शिवाजी टोमके, वैजनाथ म्हस्के, जी. एन जाधव, दौलत गडवे, कैलास जगताप, रमेश गडवे यांची उपस्थिती होती.

आंबेडकरराईट पार्टी ऑफ इंडिया (एपीआय)
आंबेडकरराईट पार्टी ऑफ इंडियातर्फे (एपीआय) शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाल्मीकी चौक, भीमनगर येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी आयोजक जिल्हाध्यक्ष विजयकुमार खोतकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

भारतीय दलित पॅंथर
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता. २६) सकाळी मिलकॉर्नर येथे भारतीय दलित पॅंथरतर्फे संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी शहर अध्यक्ष माणिक आदमाने, राहुल गवळी, विक्रम जगताप, सचिन काळे, संजय जाधव, विजय शिंदे, विशाल इंगळे, भगवान साळवे, राहुल बनकर, विलास तुपे, सतीश भालेराव, अनिल खरात, प्रकाश गायकवाड, सचिन दाभाडे, सुरेश जमधडे, रवी दांडगे, विजय रगडे, विजय साळवे यांची उपस्थिती होती.

जय भवानी विद्यामंदिर
 जय भवानी विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी झाली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका लीला वाकळे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय पवार, पर्यवेक्षिका शोभा कासलीवाल, रजनी भालेराव, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सोनवणे उपस्थित होते. या वेळी कल्पना चव्हाण, लक्ष्मण गुरखे, अंजना भिसे, सुरेखा पवार, विजय माने, लक्ष्मण जांभळीकर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रामचंद्र दर्प यांनी केले.

शिवराणा सार्वजनिक वाचनालय
पुंडलिकनगर येथील शिवराणा सार्वजनिक वाचनालयात सोमवारी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बन्सीधर श्रीवास्तव, भागवत शिंदे प्रमुख पाहुणे होते. अध्यक्षस्थानी एल. डी. ताटू होते. यावेळी रामेश्‍वर गिराम, दिगंबर गजमल, लक्ष्मण भोसले, साईनाथ पवार, हरी कापुरे, नंद श्रावणी, परेश वाघ, योगेश गाढवे, समाधान जाधव, नरहरी उबाळे, विठ्ठल पडघण, विलास गोरघोदे, सम्राट मोरे, सुभाष शिंदे, विठ्ठल जाधव, गंगाधर श्रीवास्तव यांनी पुढाकार घेतला. 

जयभीम नवक्रांती फाउंडेशन
फाउंडेशनतर्फे शाहू महाराज जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, अन्नदान करण्यात आले. या वेळी मिलिंदनगर वॉर्डाचे नगरसेवक राहुल सोनवणे, संस्थापक मिलिंद मकासरे, कैलास पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. किरण सोनवणे हिने शाहू महाराजांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संदीप दाभाडे, चेतन दाभाडे, दीपक सोनवणे, अरुण मकासरे, शोभा दुशिंग, प्रल्हाद सोनवणे, अशोक दुशिंग, सुनीता मकासरे, बाबासाहेब फंदे, तान्हाबाई मकासरे, सुनील मकासरे यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन श्‍वेता दाभाडे यांनी केले. तक्षशिला सोनवणे यांनी आभार मानले.

पदवीधर युवा परिषद 
राजर्षी शाहू महाराज परिषदेचे अध्यक्ष राजकुमार गाजरे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हनुमंत वाघमारे यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. या वेळी तेजस थोरात, आकाश मंडल, आकाश शिंदे, ऋषी मोटे, दीपक झिंजुर्डे, रोहित गायकवाड, सोमेश माने, रोहित भालेराव, विठ्ठल ढवळे, आरती दिसागज, मेघा गायकवाड, गौरी कदम, ईश्‍वरी औताडे, अंजली भालेराव यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नितीन मोहिते यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असंघटित कामगार विभागाचे राज्य प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दारकोंडे यांच्या हस्ते मिलकॉर्नर येथील शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी कन्हैयालाल मिसाळ, अनिल डोंगरे, मंगेश नाईक, सुरेश आरक, दादाराव मिसाळ, अशोक बन्सवाल, सुरेश ढगे, उमाकांत सदाफुले, ज्ञानेश्‍वर साठे, वाल्मीक लाड यांची उपस्थिती होती.

भीमशक्ती संघटना
भीमशक्ती संघटनेतर्फे  एन-२ येथे भाऊसाहेब नवगिरे, कैलास जुमडे यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रेम चव्हाण, ॲड. नितीन भुईगळ, बालाजी करंडे, विक्रम घायतडक, मोहन सातदिवे, सोपान लहिंगे, मधुकर वाघमारे, भानुदास वाकळे, गुलाब जाधव, मनोहर दांडके, रामा म्हस्के, रवी ससाणे, भानुदास भिंगारे, लखण होरशीळ, प्रल्हाद केकाण, सीताराम विखे, विनोद वेलदोडे, विनायक ठाकरे, विलास बनकर यांची उपस्थिती होती.

बेरोजगार, भूमिहीन मजूर, असंघटित कामगार संघ
संघाचे मराठवाडा अध्यक्ष राजेंद्र नवगिरे यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी अनंतकुमार मगरे, हर्षवर्धन वाघमारे, राहुल बनकर, सिकंदर करडे, भरत साबळे, अक्षय झवंर, अमोल जांदे, सतीश खरात, शैलैंद्र देहाडे यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र सेना
महाराष्ट्र सेनेतर्फे राजर्षी शाहू महाराजांची जयंती उल्कानगरी येथे साजरी करण्यात आली.  शाहू महाराजांच्या प्रतिमेला पक्षाध्यक्ष राजूभाई साबळे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. अध्यक्षस्थानी प्रवक्ते प्रमोद सिरसाठ, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष मिलिंद मोकळे, जगन साळवे, राजू त्रिभुवन, विजय खरात, ज्ञानेश्‍वर घोरपडे, प्रीतीताई दुबे, मीनाक्षी सिरसाठ, पंडितराव हिवाळे, पंडितराव राठोड, विजया लासगावकर, अमोल पगारे, भाऊसाहेब पाचारणे यांची उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. अनिलकुमार कांबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष सुनील खरात, राजकुमार अमोलिक, संदीप गवळी, दिनेश गवळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. 

शिवसेना दलित आघाडी
शिवसेना दलित आघाडीतर्फे मिलकॉर्नर येथील शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक मारोती साळवे, महेंद्र रगडे, अनिल हिवराळे, भाऊसाहेब चव्हाण, गणेश गांगवे, ज्ञानेश्‍वर ढेपे, रवी सुलाने, संजय जाटवे, ज्ञानेश्‍वर जाधव, चंदनलाल इंगळे, वसंत दांडगे, सुभाष साळवे, दिलीप सुर्वे, रामचंद्र जाधव, संजय जाधव, किशोर लाटे, सुनील पारदे, प्रभाकर कीर्तिकर, सुभाष निकाळजे, अनिल गायकवाड, पिंटू हिवराळे, सनी बंगरे, अभिनंदन ढेपे, शुभम पटेकर, रोहित दणके, रामचंद्र गायकवाड, सागर भालेराव, संतोष देहाडे यांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय चर्मकार महासंघ
औरंगाबाद - राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष संतोष जाटवे, संजय जाटवे, गणेश गरंडवाल, रवी सुलाने, दीपक हनवते, धनराज बंसवाल यांची उपस्थिती होती.

भारिप-बहुजन महासंघ
महासंघाच्या महिला आघाडी शहर अध्यक्षा शांताबाई धुळे यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माणिकराव करवंजे, दिनेश साळवे, गौतम गवळी, मंगेश निकम, पप्पू कांबळे, राहुल गायकवाड, सागर आठवले, अविनाश सरवदे, संतोष चक्रनारायण, लक्ष्मी सरवदे, रेखा उजागरे यांची उपस्थिती होती.

राजर्षी शाहू सेवा संस्था, गारखेडा
संस्थेच्या गारखेडा शाखेतर्फे शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मीनाक्षी साळुंके, संतोष पेंढारकर, विशाल इंगळे, सोनाली खंडागळे, गणेश काकडे यांची उपस्थिती होती.

भारतीय बौद्ध महासभा
भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेतर्फे शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अशोक कांबळे, किशोर जोहरे, चंद्रसेन वंजारे, रानोबा घोडके, रावसाहेब जावळे, एस. एन. कांबळे, अशोक जगताप, प्रमोद पवार यांची उपस्थिती होती.

राजर्षी शाहू सेवा संस्था, मयूरपार्क
संस्थेच्या गारखेडा मयूरपार्क शाखेतर्फे शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी राजेंद्र तायडे, विशाल गवळी, विष्णू राजपूत, रामकृष्ण दाभाडे, अतुल कुळसुंदर, सुरेश वर्मा, विठ्ठल देशमुख, गणेश कुलकर्णी, पवन सावळे यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com