विवाहितेवर चौघांकडून बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय विवाहितेस शीतपेयातून दारू पाजून मित्रासह तिघांनी निर्जनस्थळी बलात्कार केल्याची घटना गुरुवारी (ता. दोन) रात्री घडली. शेंद्रा एमआयडीसी परिसरातील टाकळी शिवारात घडलेला हा खळबळजनक प्रकार शनिवारी (ता. चार) उजेडात आला. या प्रकरणी चार नराधमांविरोधात चिकलठाणा पोलिसांत गुन्हा नोंद झाला. मुख्य आरोपी अनिल वसंत ठोंबरे याला अटक केले आहे. 

औरंगाबाद - वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय विवाहितेस शीतपेयातून दारू पाजून मित्रासह तिघांनी निर्जनस्थळी बलात्कार केल्याची घटना गुरुवारी (ता. दोन) रात्री घडली. शेंद्रा एमआयडीसी परिसरातील टाकळी शिवारात घडलेला हा खळबळजनक प्रकार शनिवारी (ता. चार) उजेडात आला. या प्रकरणी चार नराधमांविरोधात चिकलठाणा पोलिसांत गुन्हा नोंद झाला. मुख्य आरोपी अनिल वसंत ठोंबरे याला अटक केले आहे. 

मुकुंदवाडी परिसरातील संतोषीमातानगर येथील विवाहिता गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घरी एकटीच होती. या वेळी तिच्या ओळखीचा मित्र तेथे आला. त्याने माझ्या वाढदिवसाची पार्टी असल्याचे सांगून तिला दुचाकीवरून पार्टीसाठी नेले. ती देखील घरात कुणाला न सांगता बाहेर पडली. यानंतर तो विवाहितेला घेऊन बीड बायपासमार्गे झाल्टा फाटा येथे गेला. तेथे चहा घेऊन दोघे पुढे शेंद्रा परिसराकडे निघाले. त्यांच्या पाठोपाठ आणखी तिघे मित्र आले. ते विवाहितेला घेऊन शेंद्रा एमआयडीसीतील टाकळी शिवारात निर्जनस्थळी गेले. त्यांच्याजवळ जेवणाचे पार्सल, शीतपेयासोबत दारूच्या बाटल्या होत्या. तेथे शीतपेयातून महिलेला दारू पाजून चौघांनी लागोपाठ तिच्यावर बलात्कार केले.

या सर्व प्रकारामुळे महिला बेशुद्ध झाली. त्याच अवस्थेत तिला चौघांनी रात्री विमानतळासमोरील पेट्रोलपंपाजवळ सोडले. सकाळी हा प्रकार परिसरातील लोकांनी पोलिसांना कळविला. एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बेशुद्धावस्थेतील महिलेला शुक्रवारी सकाळी घाटी रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी दिली. 

शीतपेयातून दिली दारू
महिला मित्रासोबत शेंद्रा एमआयडीसीजवळील जालना रोडवरून तीन ते चार किलोमीटर आत कच्च्या रस्त्याने टाकळी शिवारात पोचली. त्यांच्या मागे २२ ते २५ वर्षे वयाचे तीन तरुण आले, तेथील एका शेतात चौघांनी दारू ढोसली. पीडितेला मित्राने शीतपेयातून दारू दिली. तिला गुंगी आल्यानंतर दोघे लगट करू लागले. प्रतिकार करताच तिला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी तिच्यावर बळजबरी करायला सुरवात केली. सुरवातीला मित्र अनिलने व त्यानंतर त्याच्या तीन मित्रांनी विवाहितेवर बलात्कार केला. 

‘घाटी’त उपचार अन्‌ दिलासा
शनिवारी सकाळी सातला ‘घाटी’च्या एका वॉर्डात पीडितेला दाखल केले. ‘दिलासा कक्षा’ने तिचे समुपदेशन केले. बारा तासांच्या उपचारानंतर पीडितेला डिस्चार्ज मिळाला. रात्री नऊच्या सुमारास पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी जबाब नोंदवून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. घटनास्थळ लक्षात घेऊन हे प्रकरण चिकलठाणा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. ‘घाटी’ने रिपोर्ट पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठविले. सुरवातीला पीडिता तक्रार द्यायला तयार नव्हती. मात्र, समुपदेशनानंतर तिच्या जबाबावरून गुन्हा नोंद करण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news rape on married women