वसुली वाढवा, वीज गळती थांबवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

औरंगाबाद - वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटचे बिल ग्राहकांकडून वसूल करा, बीलवाटप व विजेच्या अडचणी सोडवा. वसुली वाढविण्यासाठी व वीज गळती थांबविण्यासाठी कंबर कसून काम करा, असा सल्ला महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी औरंगाबाद परिमंडळातील कर्मचारी-अधिकारी अभियंत्यांना दिला. 

औरंगाबाद - वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटचे बिल ग्राहकांकडून वसूल करा, बीलवाटप व विजेच्या अडचणी सोडवा. वसुली वाढविण्यासाठी व वीज गळती थांबविण्यासाठी कंबर कसून काम करा, असा सल्ला महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी औरंगाबाद परिमंडळातील कर्मचारी-अधिकारी अभियंत्यांना दिला. 

महावितरणच्या औरंगाबाद व जळगाव परिमंडळची शनिवारी (ता.१७) संजीव कुमार यांनी बैठक घेतली. या वेळी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता बी. के. जनवीर, महापारेषणचे मुख्य अभियंता गणपत मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. संजीवकुमार म्हणाले, औरंगाबाद शहरात ४१.९८ टक्के, ग्रामीण मध्ये २३.४४ टक्के, तर जालना जिल्ह्यात २३  टक्के वीज गळतीचे प्रमाण आहे. यामुळे औरंगाबाद १७ कोटी, तर जालना १२ कोटी असे एकूण २९ कोटी रुपये नुकसान होते. जालना जिल्ह्यातील १०८ गावांमध्ये कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांचे प्रमाण ७० टक्के आहे. हे प्रमाण कमी करायला हवे. एजन्सीने अचूक रीडिंग घेऊन वेळेत ग्राहकांना बिलाचे वाटप करावे. अन्यथा आयटीय व महाविद्यालयीन विघार्थ्यांकडून रीडिंग घेण्याच्या सूचना संजीव कुमार यांनी दिल्या.

जळगाव विभागात ६२ कोटींचा तोटा 
धुळे मंडळात १९ टक्के व जळगाव मंडळात २४ टक्के, नंदुरबार जिल्ह्यात २७  टक्के वीज गळतीचे प्रमाण आहे. यामुळे धुळे मंडळात दरमहा १४ कोटी, नंदुरबार जिल्ह्यात ३६ कोटी, तर धुळे मंडळात १२.६ कोटी रुपये असे एकूण ६२.४ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. वीज कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून ग्राहकांच्या समस्या सोडवून सुरळीत वीजपुरवठा करावा. ग्राहक व लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून वीज गळती कमी करावी व थकबाकी वसूल करावी. या वेळी उद्योजकांनी संजीव कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे संजीव कुमार यांनी सांगितले.