रिक्षा, टॅक्‍सीत परवान्याची माहिती लावणे बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - राज्यात ऑटोरिक्षा, मीटर टॅक्‍सींना आपल्या वाहनासंदर्भातील सर्व माहिती प्रवाशांना दिसेल, अशा पद्धतीने वाहनामध्ये लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी 1 ऑक्‍टोबरपासून करण्याचा आदेश परिवहन विभागाने दिला आहे.

औरंगाबाद - राज्यात ऑटोरिक्षा, मीटर टॅक्‍सींना आपल्या वाहनासंदर्भातील सर्व माहिती प्रवाशांना दिसेल, अशा पद्धतीने वाहनामध्ये लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी 1 ऑक्‍टोबरपासून करण्याचा आदेश परिवहन विभागाने दिला आहे.

ऑटोरिक्षा, मीटर टॅक्‍सी, काळी-पिवळी व कूलकॅब यांना वाहनांमध्ये परवानाधारकांचा तपशील, परवान्याचा तपशील, वाहनाचा व वाहनचालकाचा तपशील त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीसाठी पोलिस हेल्पलाइन क्रमांक व संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक दर्शविणारे स्टिकर प्रवाशांना सहज दिसतील अशा पद्धतीने प्रदर्शित करण्याची अट परवान्याच्या अटीशर्तीमध्येच अंतर्भाव करण्यास राज्य परिवहन प्राधिकरणाने दिली आहे. 19 जुलैला प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली होती. यात हा ठराव केला होता. माहितीच्या नमुन्याचे स्टिकर परिवहन कार्यालयाने उपलब्ध करून त्याची पन्नास रुपये शुल्क आकारणी करण्याच्या सूचना परिवहन विभागाने दिल्या आहेत.

काय आहे शिक्षा?
वाहनचालकाने दर्शनी भागात प्रवाशांना दिसेल अशा पद्धतीने माहिती लावली नाही तर पहिल्या गुन्ह्यासाठी पाच दिवसांसाठी परवाना निलंबित करणे किंवा एक हजार रुपये दंड राहील. दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास दहा दिवसांसाठी परवाना निलंबित करणे किंवा तीन हजार रुपये दंड आकारणे आणि तिसऱ्यांदा हाच गुन्हा केल्यास परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित करणे किंवा पाच हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: aurangabad marathwada news rickshaw taxi permission information compulsory