अनेकांनी बुक केली स्वप्नातील कार

औरंगाबाद - तापडिया कासलीवाल मैदानावर सुरू असलेल्या ‘सकाळ ऑटो एक्‍स्पो-2017’ मध्ये भेट देत दुचाकीची पाहणी करताना ग्राहक.
औरंगाबाद - तापडिया कासलीवाल मैदानावर सुरू असलेल्या ‘सकाळ ऑटो एक्‍स्पो-2017’ मध्ये भेट देत दुचाकीची पाहणी करताना ग्राहक.

औरंगाबाद - ‘सकाळ’ व चेंबर ऑफ ऑथरॉइज्ड ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन व रेड एफएम (रेडिओ पार्टनर) यांच्यातर्फे चारदिवसीय ‘सकाळ ऑटो एक्‍स्पो-२०१७’ ला शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. प्रदर्शनात शनिवारी (ता. नऊ) अनेकांनी आपल्या स्वप्नातील आवडीच्या कार आणि दुचाकीची बुकिंग केली. 

अदालत रोडवरील कासलीवाल-तापडिया मैदानावर हा एक्‍स्पो सुरू आहे. शहरवासीयांना ऑटो मोटर्समधील विविध प्रकार आणि नावीन्याची माहिती व अनुभूती मिळावी, याच उद्देशाने हा एक्‍स्पो घेण्यात येत आहे. या प्रदर्शनात वीस दुचाकी व चारचाकी कंपन्या आणि शोरूमचा सहभाग आहे. या एक्‍स्पोमध्ये विविध दुचाकी, चारचाकी व कमर्शिअल वाहन खरेदीबरोबरच विविध बक्षिसे आणि ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शनिवारी सकाळपासून शहरवासीयांनी एक्‍स्पोमधील विविध स्टॉलला भेट दिली. यात अनेकांनी आपल्या आवडत्या कार आणि दुचाकींसह इतर गाड्यांची बुकिंग केली.

एक्‍स्पोमध्ये विविध कंपन्यांतर्फे ठेवण्यात आलेल्या ऑफर्सचाही फायदा ग्राहकांनी घेतला. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना रोज लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

सहभागी कंपन्या व शोरूम 
या प्रदर्शनात धूत ह्युंदाई, मारुती सुझुकी, सतीश मोटर्स, शरयू टोयोटा, नेक्‍सा सेव्हन हिल्स पगारिया ऑटो, एसकेवायएस ऑटोमोबाइल, पगारिया ऑटो सुपर कॅरी, एसबीआय बॅंक लि., रत्नप्रभा होंडा, डिलक्‍स सुझुकी, एचडीएफसी बॅंक, टू-रिव्हर्स हारले डेव्हिडसन-पुणे, मोहरीर ऑटो प्रा. लि., एटीसी ऑटोमोटिव्ह, एसटीसी मोटर्स, गिरजा मोटर्स ॲण्ड ग्लोबल कार्स यांचा सहभाग आहे. 

गाड्या पाहण्याचा आज शेवटचा दिवस
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या ‘सकाळ ऑटो एक्‍स्पो’चा रविवारी (ता. दहा) समारोप होणार आहे. या ठिकाणी ग्राहकांना सर्व प्रकारच्या गाड्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी ९६०४५७७२२२, ९८२३११११६६ यावर संपर्क साधावा; तसेच प्रदर्शनात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

आज अनुभवा सायकल आणि ‘दुचाकींची चित्तथरारक प्रात्यक्षिके’ 
‘सकाळ ऑटो एक्‍स्पो’मध्ये स्वातंत्र्यकाळातील बॅन्टम १२४ सीसी असलेली दुचाकी आणि बीएसए ही ३५० सीसीची दुचाकी आकर्षण ठरत आहेत. याचबरोबर प्रदर्शनात रविवारी (ता. दहा) सायंकाळी पाच वाजता औरंगाबाद आणि हैदराबाद येथील टीम सुपरटेक थर्टीनचे (TST) कैसर इनामदार, सोहेल कुरैशी, सतीश बोरसे हे दुचाकीवरून चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. यासह स्टंट क्रॅकर टीमतर्फे आदित्य घुसळे हा दुचाकीवरून प्रात्यक्षिक सादर करेल. तर ओमकार शिंदे, लखन पवार आणि प्रतीक वाघ हे सायकलवरून चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. हा थरार बघण्याची संधी सोडू नका, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com