दोन्ही मुलांना प्रत्येकी एक लाख, पत्नीस नोकरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

पंकजांकडून हुतात्मा जाधव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन 
व्यायामशाळेसाठी २५ लाख रुपये देण्याची घोषणा

पंकजांकडून हुतात्मा जाधव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन 
व्यायामशाळेसाठी २५ लाख रुपये देण्याची घोषणा

आमठाणा - केळगाव (ता. सिल्लोड) येथील हुतात्मा संदीप जाधव यांच्या कुटुंबीयांचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी (ता. २७) रात्री नऊच्या दरम्यान सांत्वन केले. (स्व.) गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे हुतात्मा जाधव  यांचा  मुलगा  व  मुलगी अशा दोघांच्या नावे  प्रत्येकी एक लाख रुपये फिक्‍स डिपॉझिट करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले; तसेच वीर पत्नी उज्ज्वलाताई जाधव यांना वैद्यनाथ सहकारी बॅंकेत एक जुलैपासून नोकरी देण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडे यानी सांगितले. 
संदीप जाधव यांच्या नावाने व्यायामशाळा काढण्यात येईल. त्यासाठी  ग्रामविकास मंत्रालयामार्फत पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. संदीप जाधव याच्या दोन्ही मुलांचे शिक्षण गोपीनाथ  मुंडे प्रतिष्ठानतर्फे करण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिली. 

मुंडे परिवार व सरकार सदैव जाधव कुटुंबीयांच्या पाठीशी राहील, असे स्पष्ट करून पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘केळगाव ही वीर जवानांची भूमी असून, येथील पंचवीस जवान हे देशाचे रक्षण करीत आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे.’’
या प्रसंगी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोठे, इद्रिस मुलतानी, अशोक गरूड, दिलीप दाणेकर, सुनील मिरकर, सचिन चौधरी, सरपंच सोमनाथ कोल्हे, विकास मुळे, ग्रामस्थ उपस्थित होते.